Flax seeds benefits: आरोग्यदायी जवसाचे आहेत ‘इतके’ फायदे, अळशीच्या बिया दररोज खाल्ल्याने काय होईल?
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health Benefits of Flax seeds in Marathi: अळशीच्या बिया खाणं हे आरोग्यासाठी फायद्याचं आहे. अळशीच्या बियांना जवस या नावानेही ओळखलं जातं. अळशीच्या बियांमध्ये विविध पोषक तत्वे असतात जी शरीराच्या विविध अवयवांच्या आरोग्यासाठी फायद्याची ठरतात. दररोज 1चमचा अळशीच्या बिया खाल्ल्यास किंवा मिस्करमध्ये वाटून पाण्यात टाकून प्यायल्यास अनेक गंभीर आजारांना दूर ठेवता येऊ शकतं जाणून घेऊयात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अळशीच्या बिया खाणं धोक्याचं ठरू शकतं. जाणून घेऊयात अळशीच्या बिया खाण्याचे फायदे.
advertisement
1/9

अळशीच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स चांगल्या प्रमाणात आढळून येतात. यामुळे त्वचा तजेलदार राहायला मदत होऊन चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्याचं प्रमाण कमी होतं. अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते.
advertisement
2/9
अळशीच्या बियांमध्ये अल्फा लिनोलिक ॲसिड आढळतं. जे शरीराला संधिवात, दमा, मधुमेह आणि कर्करोगाविरूध्द लढण्यास मदत करतं. कोलन कॅन्सरवर अळशीच्या बिया अतिशय गुणकारी आहेत.
advertisement
3/9
अळशीच्या बियांमुळे रक्तातल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारून हृदयाची कार्यक्षमता वाढते परिणामी हृदयविकार किंवा हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता मावळते.
advertisement
4/9
अळशीच्या बिया शरीरातील अतिरिक्त फॅट्सचं प्रमाण कमी करतात, त्यामुळे पोटाचा घेर कमी होऊन वजन नियंत्रणात राहायला मदत होते.
advertisement
5/9
अळशीच्या बियांचं मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहायला मदत होते. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांसाठी अळशीच्या बिया खाणं फायद्याचं ठरू शकतं. मात्र डायबिटीसच्या रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अळशीच्या बियांचं सेवन करू नये.
advertisement
6/9
अळशीच्या बियांचा विशेष फायदा हा महिलांना होतो. अळशीच्या बियांमध्ये आढळणारं लिग्नान आतड्यांमध्ये सक्रिय स्त्री संप्रेरकांचं संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
advertisement
7/9
अळशीच्या बिया जितक्या फायदेशीर आहे तितकंच अळशीचं तेलही आरोग्यदायी आहे. जवसाच्या तेलाने शरीराला मसाज केल्याने त्वचेसोबतच अंतर्गत अवयवांचं कार्य सुधारतं.
advertisement
8/9
आपल्या शरीरासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे खूप महत्वाचं असतं. मासांहारी व्यक्तींना माशांमधून ओमेगा 3 ॲसिड मिळतं. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळून येत असल्याने शाकाहारी व्यक्तींसाठी अळशीच्या बिया या कोणत्या औषधापेक्षा कमी नाही ठरत.
advertisement
9/9
अळशीच्या बियांचे काही फायदे जरी असले तरीही त्यांचे काही तोटे सुद्धा आहेत. त्यामुळे योग्य प्रमाणात अळशीच्या बियांचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. याशिवाय ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अळशीच्या किंवा जवसाच्या बियां खाऊ नयेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Flax seeds benefits: आरोग्यदायी जवसाचे आहेत ‘इतके’ फायदे, अळशीच्या बिया दररोज खाल्ल्याने काय होईल?