Orange Health Benefits: हिवाळ्यात संत्री खाण्याची ‘ही’ आहे योग्य वेळ, अवेळी खाल्यास पडाल आजारी
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Orange Health Benefits in Marathi: संत्र्यांत व्हिटॅमिन सी खूप जास्त असतं त्यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर निरोगी राहायला मदत होते. मात्र तरीही अनेकादा संत्री खाल्ल्याने घसा खवखवण्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे हिवाळ्यात संत्री खाण्याची योग्य वेळ कोणती ते जाणून घेऊया.
advertisement
1/7

हिवाळ्यात थंडी आणि प्रदूषणामुळे अनेकांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे हिवाळ्यात फिट राहण्यासाठी पौष्टिक आहारसोबत आरोग्यदायी फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement
2/7
संत्र्याला हिवाळ्यातलं सुपरफूड मानलं गेलंय. संत्र्यांत व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायद्याचं ठरतात.
advertisement
3/7
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातले विषारी बाहेर टाकले जाऊन मुक्त रॅडिकल्सपासून होणारे नुकसान टाळता येतं.
advertisement
4/7
संत्र्यात असलेले फ्लेव्होनॉइड्स हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रीत राहण्यास मदत होऊन हृदयविकार आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळता येतो.
advertisement
5/7
संत्र्यांत फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि अतिरिक्त भूक लागत नाही त्यामुळे वजन नियंत्रित राहायला मदत होते. फायबर्समुळे खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीने पचायला मदत होते.
advertisement
6/7
थंडीत त्वचा कोरडी पडण्याचा तक्रारी वाढतात. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. संत्री दररोज खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि तजेलदार राहण्यास मदत होते.
advertisement
7/7
ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांनी सकाळी आणि रात्री संत्री खाणं टाळावं. संत्री खाण्याची योग्य वेळ ही दुपारची मानली जाते. त्यामुळे तुम्ही हिवाळ्यात दुपारी संत्री खाल्ल्यास सर्दी खोकल्यापासून तुमचा बचाव तर होईलच आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Orange Health Benefits: हिवाळ्यात संत्री खाण्याची ‘ही’ आहे योग्य वेळ, अवेळी खाल्यास पडाल आजारी