Jaggery Tea : गुळाचा चहा फाटतोय? टेन्शन सोडा! 'या' सोप्या टिप्स वापरून बनवा हॉटेलसारखा फक्कड चहा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गुळाचा चहा बनवताना गृहिणींसमोर सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे चहा फाटणे. अनेकदा चहा उकळताना किंवा दूध टाकल्या टाकल्या तो फुटतो आणि कष्टावर पाणी फेरले जाते. जर तुमच्यासोबतही असं घडत असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. गुळाचा चहा न फाटता उत्तम कसा बनवायचा, याच्या काही खास टिप्स जाणून घेऊया.
advertisement
1/9

आपल्या भारतीयांच्या सकाळची सुरुवात वाफाळलेल्या चहाच्या कपाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मग तो अद्रक घातलेला चहा असो किंवा मसाला चहा. पण गेल्या काही वर्षांत आरोग्याप्रती जागरूकता वाढल्यामुळे अनेकांनी साखर बंद करुन 'गुळाचा चहा' (Jaggery Tea) स्वीकारला आहे. गुळाचा चहा चवीला तर अप्रतिम लागतोच, शिवाय तो आरोग्यासाठीही फायदेशीर असतो.
advertisement
2/9
मात्र, गुळाचा चहा बनवताना गृहिणींसमोर सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे चहा फाटणे. अनेकदा चहा उकळताना किंवा दूध टाकल्या टाकल्या तो फुटतो आणि कष्टावर पाणी फेरले जाते. जर तुमच्यासोबतही असं घडत असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. गुळाचा चहा न फाटता उत्तम कसा बनवायचा, याच्या काही खास टिप्स जाणून घेऊया.
advertisement
3/9
चहा का फाटतो? शास्त्रीय कारणगुळामध्ये नैसर्गिकरित्या काही प्रमाणात आम्ल (Acid) असते. जेव्हा आपण हे आम्लयुक्त गूळ उकळत्या दुधात टाकतो, तेव्हा दुधातील प्रथिने गोठतात आणि चहा फुटतो. तसेच गुळातील अशुद्धता देखील याला कारणीभूत ठरू शकते.
advertisement
4/9
गुळाचा चहा न फाटण्यासाठी फॉलो करा या '5' सोप्या टिप्स:1. दूध शेवटी घाला: ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. पाणी, चहापावडर, आले आणि वेलची व्यवस्थित उकळून घ्या. त्यानंतर त्यात गूळ टाका आणि गूळ विरघळला की गॅस बंद करा. आता एका बाजूला गरम करून ठेवलेले दूध चहामध्ये ओता आणि चमच्याने हलवा. गॅस चालू असताना दूध घातल्यास चहा फाटण्याची शक्यता 90% असते.
advertisement
5/9
2. दूध आधी गरम करून घ्या: कधीही थंड दूध गुळाच्या चहात ओतू नका. दूध वेगळ्या पात्रात चांगले उकळून घ्या आणि मगच ते तयार काळ्या चहामध्ये मिसळा. दोन्हीचे तापमान सारखे असल्यास चहा फाटत नाही.
advertisement
6/9
3. गुळाची पावडर किंवा किसलेला गूळ वापरा : गुळाचे मोठे खडे विरघळायला वेळ लागतो, ज्यामुळे चहा जास्त वेळ उकळला जातो आणि फाटतो. त्याऐवजी गूळ किसून किंवा गुळाची पावडर वापरा, जेणेकरून तो चटकन विरघळेल.
advertisement
7/9
4. सेंद्रिय (Organic) गूळ निवडा: केमिकलचा वापर केलेला पांढरट किंवा पिवळसर गूळ लवकर चहा फाडतो. त्याऐवजी गडद रंगाचा, सेंद्रिय किंवा काळा गूळ वापरावा. हा गूळ आरोग्यासाठीही उत्तम असतो आणि चहा फाटण्याचे प्रमाणही कमी असते.
advertisement
8/9
5. आल्याचा वापर जपून करा: आल्यामध्ये देखील विशिष्ट एन्झाइम्स असतात जे दूध फाडण्यास मदत करतात. त्यामुळे गूळ आणि आले एकत्र जास्त वेळ उकळू नका.
advertisement
9/9
गुळाचा चहा पिण्याचे फायदे पचन सुधारते: जेवणानंतर गुळाचा चहा पिल्याने पचन क्रिया सुरळीत होते. अ‍ॅनिमियावर गुणकारी: गुळात लोह (Iron) भरपूर असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. रोगप्रतिकारशक्ती: साखर शरीरातील ऊर्जा कमी करते, तर गूळ प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Jaggery Tea : गुळाचा चहा फाटतोय? टेन्शन सोडा! 'या' सोप्या टिप्स वापरून बनवा हॉटेलसारखा फक्कड चहा