TRENDING:

Brain Health : रोज 'ही' कामं करा; मेंदू राहील कायम तरुण, 'स्मृतिभ्रंश'सारख्या आजाराचा धोका टळेल

Last Updated:
How To Keep Brain Healthy : वाढत्या वयाचा परिणाम शरीरातील बाह्य बदलांसोबतच मेंदूवरही होतो. वयाच्या 50 नंतर, मेंदू आकुंचन पावू लागतो आणि त्यामुळे मेंदूच्या संज्ञानात्मक क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. मात्र यावापूर्वीच जर मेंदूच्या कार्यावर परिणाम झाला तर अकाली काही गंभीर आजारांचा धोका वाढतो. परंतु, तुम्ही नियमित काही गीष्टी केल्यास मेंदू म्हातारपणीही तरुण राहू शकतो.
advertisement
1/7
रोज 'ही' कामं करा; मेंदू राहील कायम तरुण, 'स्मृतिभ्रंश'सारख्या आजाराचा धोका टळेल
मेंदूच्या संज्ञानात्मक क्षमतेवर परिणाम झाल्यास व्यक्तीला गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण येते, लक्ष केंद्रित करण्यात आणि अनेक काम करण्यात अडचणी येतात. हार्वर्ड हेल्थच्या मते, जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या आणि त्याच आधारावर तुमच्या मेंदूची काळजी घेतली तर या गोष्टी तुमचा मेंदू दीर्घायुष्यासाठी निरोगी आणि तरुण ठेवतील. तुम्ही विसरण्याच्या समस्यांपासून वाचू शकाल.
advertisement
2/7
तुमचा मेंदू सक्रिय ठेवा : शक्यतो तुमचा मेंदू सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी कोडी, गणिताचे प्रश्न, मेंदूचे खेळ खेळा. असे केल्याने नसा आणि मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होत राहतात आणि भविष्यात पेशी खराब होण्याची समस्या उद्भवत नाही.
advertisement
3/7
शारीरिक व्यायाम महत्त्वाचा : संशोधनात असे आढळले आहे की, जेव्हा तुमचे स्नायू सक्रिय असतात आणि तुम्ही चांगला व्यायाम करता तेव्हा त्याचा मेंदूच्या ऊतींवरही परिणाम होतो आणि शिरांमध्ये रक्तप्रवाह चांगला झाल्यामुळे नवीन चेतापेशी तयार होतात, ज्यामुळे रोग बरे होण्यास मदत होते.
advertisement
4/7
सकस आहार घ्या : अनसॅच्युरेटेड फॅट, मासे, सुका मेवा, फळे, भाज्या इत्यादींचा आहारात समावेश करा. यामध्ये असलेले प्रोटीन मेंदूला निरोगी ठेवते आणि डिमेंशियासारखे आजार दूर राहतात.
advertisement
5/7
हे आजार होऊ देऊ नका : उच्च रक्तदाब, उच्च रक्त शर्करा, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल इत्यादी समस्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी जीवनशैली सक्रिय ठेवा आणि गरज पडल्यास औषधोपचार घ्या.
advertisement
6/7
भावनांची काळजी घ्या : जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ उदासीनता, चिंता यासारख्या मानसिक समस्यांशी झुंजत असेल, तर त्याचा मेंदूवर परिणाम होऊन त्याच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. यामुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो.
advertisement
7/7
सोशल नेटवर्किंग वाढवा : संशोधनात असे आढळले की, सशक्त सोशल नेटवर्किंग तुम्हाला स्मृतिभ्रंश-संबंधित गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. यामुळे रक्तदाबही कमी राहतो आणि तुम्ही दीर्घायुष्य जगू शकाल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Brain Health : रोज 'ही' कामं करा; मेंदू राहील कायम तरुण, 'स्मृतिभ्रंश'सारख्या आजाराचा धोका टळेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल