Calcium Rich Food : दूध प्यायला अजिबात आवडत नाही? कॅल्शियमची खा हे पदार्थ, नेहमी राहाल फिट..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Calcium Rich Food : चांगले आरोग्य राखण्यासाठी संपूर्ण आहार घेणं आवश्यक आहे. मात्र हल्ली घाई गडबडीत लोक संपूर्ण आहार घेणं टाळलात. यामुळे शरीराला पोषण मिळत नाही. मात्र दुधाला आपल्याकडे संपूर्ण पोषक आहार मानले जाते. पण काही लोकांना दूध पिणे देखील आवडत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही काही अशा पदार्थांची यादी घेऊन आलो आहोत. जे तुमच्यासाठी दुधाला अचूक पर्याय ठरू शकतात.
advertisement
1/7

दुधामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम तसेच इतर अनेक पोषक घटक असतात. जे शरीराला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते. तुम्हाला दूध आवडत नसल्यास तुम्ही आपल्या आहारात काही कॅल्शियम समृद्ध खाद्यपदार्थ सामील करू शकता. जाणून घेऊया हे पदार्थ कोणते आहेत.
advertisement
2/7
रताळे : रताळ्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. एका मोठ्या आकाराच्या रताळ्यामध्ये अंदाजे 68 मिलीग्राम कॅल्शियम असते. यासोबतच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियमचे प्रमाणही पुरेसे असते. दुधाऐवजी तुम्ही रताळी तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता.
advertisement
3/7
चिया सीड्स : दोन चमचे चिया सीड्समध्ये अंदाजे 179 मिग्रॅ कॅल्शियम असते. दुधाऐवजी तुम्ही चिया सिड्सदेखील खाऊ शकता. यासोबतच चिया सीड्समध्ये बोरॉन देखील असते, जे शरीराला कॅल्शियम पुरवण्यासोबतच फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे चयापचय करून हाडे आणि स्नायूंच्या आरोग्याला प्रोत्साहन देते.
advertisement
4/7
सोया मिल्क : दुधाच्या जागी तुम्ही सोया मिल्कही घेऊ शकता. गायीच्या दुधाइतकेच कॅल्शियम सोया दुधात असते. इतकेच नाही तर सोया मिल्कमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि व्हिटॅमिन डी देखील चांगल्या प्रमाणात असते. यासोबतच दुधाच्या तुलनेत सोया दुधात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे सोया दूध आरोग्यदायी मानले जाते.
advertisement
5/7
टोफू : टोफू हा कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत देखील मानला जातो. पण यासाठी टोफूच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण त्यात असलेले कॅल्शियमचे प्रमाण त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. साधारणपणे अर्धा कप टोफूमध्ये 275 ते 961 मिलीग्राम कॅल्शियम असू शकते.
advertisement
6/7
संत्री : कॅल्शियमसाठी तुम्ही संत्र्याचेही सेवन करू शकता. संत्री व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. अंदाजानुसार, मोठ्या आकाराच्या संत्र्यापासून अंदाजे 74 मिलीग्राम कॅल्शियम मिळू शकते. याप्रमाणे एक ग्लास संत्र्याच्या ज्यूसमध्ये कॅल्शियमचे प्रमाण 300 मिलीग्राम पर्यंत असू शकते.
advertisement
7/7
तीळ : कॅल्शियमसाठी तुम्ही आहारात तिळाचाही समावेश करू शकता. एक चमचा तिळात सुमारे 88 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. यासोबतच यात जस्त आणि तांबे देखील भरपूर प्रमाणात असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात तीळाचा समावेश कोणत्याही प्रकारे करू शकता आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Calcium Rich Food : दूध प्यायला अजिबात आवडत नाही? कॅल्शियमची खा हे पदार्थ, नेहमी राहाल फिट..