TRENDING:

Acidity Vs Blotting : पोट दुखतंय, पण ही अ‍ॅसिडिटी आहे की ब्लोटिंग? वेळीच ओळखा, नाहीतर गंभीर होईल तुमचा त्रास

Last Updated:
Difference Between Acidity And Blotting : काहीवेळा आपल्या जीवनशैलीमुळे किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आपल्याला ब्लॉटिंग किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. पण काही लोकांना या दोन्हीतील फरक माहित नसतो. यामुळे त्यांचा त्रास वाढू शकतो. चला तर मग पाहूया, ब्लॉटिंग आणि अ‍ॅसिडिटी या दोन्हींमध्ये नेमका फरक काय.
advertisement
1/7
पोट दुखतंय, ही अ‍ॅसिडिटी आहे की ब्लोटिंग? वेळीच ओळखा, नाहीतर गंभीर होईल त्रास
कधीतरीच त्रास झाल्यावर आपण डॉक्टरकडे जातो. मात्र ज्या लोकांना कायम असा त्रास होतो ते यावर घरीच उपाय करतात. पण बऱ्याच लोकांना ब्लॉटिंग आणि अ‍ॅसिडिटी यांच्यातील फरक माहित नसतो. अशावेळी चुकीची औषधी घेतली जाऊ शकतात. म्हणून यांच्यातील फरक ओळखणं आवश्यक आहे.
advertisement
2/7
अ‍ॅसिडिटीबद्दल बोलायचं झालं तर अ‍ॅसिडिटीमुळे छातीत जळजळ, ढेकर किंवा वरच्या पोटात जळजळ होते. याउलट ब्लॉटिंगमध्ये पोटावर दाब, जडपणा किंवा पोट फुगते. ही दोन्ही लक्षणं एकाचवेळी दिसल्यास त्यामुळे गोंधळ उडू शकतो.
advertisement
3/7
अपोलो हॉस्पिटल्सच्या इंटरनल मेडिसिनमधील डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी एबीपीशी संवादात सांगितले की, वारंवार पोट फुगणे या त्रासाला कमी लेखू नये. कारण ते इरिटेबल बाऊल सिंड्रोम, मेटाबॉलिक डिसऑर्डर किंवा हार्मोनल असंतुलनाचे लक्षण असू शकते.
advertisement
4/7
जेव्हा पोट फुगणे ही समस्या वारंवार होऊ लागते, तेव्हा ते चिंतेचे कारण बनू शकते. यातील काही लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. रोज पोट फुगणं, खाल्ल्यानंतर वाढणे, पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा अतिसार, लवकर पोट भरल्यासारखे वाटणे, थकवा, वजन कमी होणे किंवा ताप.
advertisement
5/7
ही सर्व लक्षणं तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकली तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. यामध्ये हार्मोन्स आणि थायरॉईड देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. कमी थायरॉईड पातळी आतड्यांची हालचाल मंदावू शकते.
advertisement
6/7
अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असताताना अँटासिड्स घेतल्यास तात्काळ आराम मिळतो. परंतु वारंवार पण जर वारंवार पोट फुगत असेल, दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ त्रास होत असेल किंवा भूक, झोप, दैनंदिन कमनवर याचा परिणाम होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Acidity Vs Blotting : पोट दुखतंय, पण ही अ‍ॅसिडिटी आहे की ब्लोटिंग? वेळीच ओळखा, नाहीतर गंभीर होईल तुमचा त्रास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल