TRENDING:

Famous Misal Mumbai : मुंबईतील एकमेव ठिकाण, फक्त 25 रुपयांत 5 प्रकारची मिसळ, अशी चव चाखलीच नसेल

Last Updated:
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांची मिसळ एकाच ठिकाणी चाखायची असेल, तर प्रभादेवीतील गावड्यांची मिसळ हे ठिकाण खास तुमच्यासाठी आहे. इथे फक्त 25 रुपयांपासून पोटभर मिसळ मिळते.
advertisement
1/5
मुंबईतील एकमेव ठिकाण, फक्त 25 रुपयांत 5 प्रकारची मिसळ, अशी चव चाखलीच नसेल
मुंबईकरांसाठी मिसळ हा फक्त नाश्ता नाही, तर ती एक सवय आहे, एक चव आहे आणि एक भावना आहे. वडापावनंतर जर कोणता पदार्थ मुंबईत सर्वाधिक आवडीने खाल्ला जातो, तर ती म्हणजे मिसळ. सकाळी कामावर जाण्यापूर्वी, दुपारी भूक लागली की किंवा संध्याकाळी मित्रांसोबत गरमागरम तर्री, उसळ आणि पाव असा बेत अनेकांच्या दिवसाचा भाग असतो. आणि जर तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांची मिसळ एकाच ठिकाणी चाखायची असेल, तर प्रभादेवीतील गावड्यांची मिसळ हे ठिकाण खास तुमच्यासाठी आहे. इथे फक्त 25 रुपयांपासून पोटभर मिसळ मिळते.
advertisement
2/5
या ठिकाणी एकूण पाच प्रकारच्या मिसळी मिळतात. पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, कोल्हापुरी मिसळ, मुंबई स्टाईल मिसळ आणि गावरान स्टाईल मिसळ अशा वेगवेगळ्या चवी येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीप्रमाणे मिसळ निवडता येते. एकाच ठिकाणी पाच वेगळ्या चवींचा अनुभव घेण्याची संधी येथे मिळते, हीच या दुकानाची मोठी खासियत आहे.
advertisement
3/5
पुणेरी मिसळ इथे थोडी कमी तिखट ठेवली जाते. उसळ व्यवस्थित शिजवलेली असते आणि त्यावर फरसाण, कांदा टाकून तर्री घातली जाते. नाशिक मिसळ थोडी जास्त रस्सेदार असते. तिच्या तर्रीला लालसर रंग आणि मसाल्याची चांगली चव असते. या दोन्ही प्रकारांमध्ये चवीचा वेगळेपणा स्पष्ट जाणवतो आणि दोन्ही मिसळींची स्वतःची खास ओळख आहे.
advertisement
4/5
कोल्हापुरी मिसळ मात्र झणझणीत असते. लालभडक तर्री आणि मसालेदार उसळ यामुळे तिखट खाणाऱ्यांना ती जास्त आवडते. मुंबई स्टाईल मिसळ सर्वसाधारण चवीची ठेवली जाते, त्यामुळे ती सर्व वयोगटातील लोकांना आवडते. गावरान स्टाईल मिसळ ही या दुकानाची खास ओळख आहे. मोड आलेली मटकी, कांदा-टोमॅटो आणि काळा किंवा आगरी मसाला घालून उसळ बनवली जाते. तर्रीसाठी सुके खोबरे, तीळ, खसखस, भाजलेला कांदा, लसूण आणि कोथिंबीर वाटून मसाला तयार केला जातो. तो तेलात चांगला परतून त्यात तिखट घालून गरम तर्री तयार केली जाते. मग एका भांड्यात उसळ घालून त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर टाकून वरून ही तर्री ओतली जाते आणि पावसोबत सर्व्ह केली जाते.
advertisement
5/5
हे दुकान प्रभादेवीमध्ये परेल एसटी डेपोच्या शेजारी आहे, त्यामुळे ते सहज सापडते. दोन मायलेकींनी मिळून हा व्यवसाय सुरू केला आहे आणि आज त्यांच्या मेहनतीमुळे हे ठिकाण मिसळप्रेमींच्या पसंतीस उतरले आहे. किंमत फक्त 25 रुपयांपासून सुरू होत असल्यामुळे कमी पैशात चवदार आणि पोटभर मिसळ खाता येते. मुंबईत वेगवेगळ्या प्रकारची मिसळ एकाच ठिकाणी चाखायची असेल अनेकांचे हे आता फेवरेट फूड स्टॉप झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Famous Misal Mumbai : मुंबईतील एकमेव ठिकाण, फक्त 25 रुपयांत 5 प्रकारची मिसळ, अशी चव चाखलीच नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल