TRENDING:

Farzi 2: 'फर्जी 2' केव्हा येणार? शाहिद कपूरला फॅन्सचा प्रश्न; दोन शब्दातच दिलं उत्तर

Last Updated:
'ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ'वर कमालीची सुपरहिट ठरलेल्या 'फर्जी' वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या वेबसीरीजचा लवकरच दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच वेबसीरीजचा आगामी सीझन येणार असल्याची हिंट चाहत्यांना दिली आहे.
advertisement
1/6
'फर्जी 2' केव्हा येणार? शाहिद कपूरला फॅन्सचा प्रश्न; दोन शब्दातच दिलं उत्तर
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून फेमस झालेला शाहिद कपूर सध्या 'ओ रोमियो' चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सक्सेसचा आनंद घेत असताना शाहिदच्या सुपरहिट वेबसीरिजबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 2023 साली रिलीज झालेल्या 'फर्जी' वेबसीरिजचा आता लवकरच दुसरा सीझन येणार आहे. वेबसीरिजच्या दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत चाहत्यांना हिंट दिली आहे.
advertisement
2/6
फेब्रुवारी 2023 मध्ये 'फर्जी' वेबसीरीजचा पहिला सीझन रिलीज झाला होता. 'ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ'वर ही वेबसीरीज रिलीज झाली होती. आता लवकरच या वेबसीरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वेबसीरीजचे दिग्दर्शक राज अँड डिके यांनी सोशल मीडियावर "राऊंड 2 इन प्रोग्रेस" असं कॅप्शन देत एक पोस्ट शेअर केली होती. चाहत्यांसमोर 'फर्जी'च्या दुसऱ्या सीझनची रिलीज डेट समोर आलेली नाही.
advertisement
3/6
अलीकडेच, शाहिद कपूरने इन्स्टाग्रामवर "आस्क मी एनिथिंग" हे सेशन ठेवलं होतं. या सेशन दरम्यान त्याला एका चाहत्याने 'फर्जी' वेबसीरीजचा दुसरा सीझन केव्हा येणार असा प्रश्न विचारला होता. अभिनेत्याने चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर दिले की, पुढच्या शुक्रवारी तुम्हाला वेबसीरीजचे अपडेट मिळतील. अभिनेत्याने दिलेल्या अपडेटनंतर चाहते वेबसीरीजसाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.
advertisement
4/6
गेल्या तीन वर्षांपासून 'फर्जी' वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर चाहत्यांना त्यांची आवडती वेबसीरीज केव्हा रिलीज होणार? याची अपडेट मिळणार आहे. वेबसीरीजमध्ये शाहिद एक प्रोफेशनल आर्टिस्ट दाखवला आहे. तो कशा पद्धतीने खोट्या नोटा बनवतो आणि त्या चलनात आणतो ? हे आपल्याला पाहायला मिळत आहे. वेबसीरिजमध्ये बनावट नोटा छापणारा व्यवसाय जवळून दाखवण्यात आला आहे.
advertisement
5/6
'फर्जी' वेबसीरिजमध्ये काळा पैसा, बनावट नोटा, राजकारणी मंडळींची विचारसरणी आणि आर्थिक विषमता अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'फर्जी' या वेबसीरिजच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने आणि टॉलिवूड अभिनेता विजय सेतूपथीने देखील ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे.
advertisement
6/6
शाहिद कपूर, विजय सेतूपथी, के. के. मेनॉन, भुवन अरोरा, राशी खन्ना, अमोल पारेकर आणि रेगिना कस्सांड्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत असून राज अँड डिके यांनी वेबसीरीजचे दिग्दर्शन केले आहे. 'फर्जी' वेबसीरीडच्या दुसऱ्या भागामध्ये कोणते कथानक असेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Farzi 2: 'फर्जी 2' केव्हा येणार? शाहिद कपूरला फॅन्सचा प्रश्न; दोन शब्दातच दिलं उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल