T20 World Cup : पाकिस्तान जिंकणार टी-20 वर्ल्ड कप? जुळून आलाय विचित्र योगायोग, एक दोनदा नाही 3 वेळा असं घडलंय!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pakistan T20 World Cup : ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच विचित्र योगायोग जुळून आलाय. त्यामुळे पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. नेमकं पाकिस्तान खुश का झाला? जाणून घ्या
advertisement
1/7

यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये रोमांचक सामने पहायला मिळाले. मोठे उलटफेर झाले. अशातच प्रबळ दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलिया संघ बाहेर पडला आहे. मात्र, पाकिस्तानला याचा फायदा होऊ शकतो.
advertisement
2/7
ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच विचित्र योगायोग जुळून आलाय. त्यामुळे पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. नेमकं पाकिस्तान खुश का झाला? जाणून घ्या
advertisement
3/7
1992 साली जेव्हा पाकिस्तानने इम्रान खान याच्या नेतृत्वाखाली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळी ऑस्ट्रेलियाची टीम ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली होती.
advertisement
4/7
तर 2009 मध्ये जेव्हा पाकिस्तानने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळी देखील ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलपर्यंत पोहोतला आलं नव्हतं. कांगारू ग्रुप स्टेजमधून बाहेर झाले होते.
advertisement
5/7
तर 2017 मध्ये देखील असंच घडलं. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर गेली अन् इकडे पाकिस्ताने थेट चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
advertisement
6/7
अशातच या वर्षी देखील असा विचित्र योगायोग जुळून आला आहे. ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून झाली असून आता पाकिस्तान सुपर 8 मध्ये पोहोचली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, पाकिस्तानने आता स्पीड पकडली असल्याने सर्वांची धाकधूक वाढली आहे. पाकिस्तानच्या संघाला टीम इंडियाने धूळ चारली होती. पण पाकिस्तानने चिवट झुंज दिल्याचं इतर सामन्यात दिसलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : पाकिस्तान जिंकणार टी-20 वर्ल्ड कप? जुळून आलाय विचित्र योगायोग, एक दोनदा नाही 3 वेळा असं घडलंय!