Amruta Khanvilkar : 'काही गोष्टी पडद्यामागेच चांगल्या असतात', नेमकं कशाबद्दल बोलतेय अमृता खानविलकर?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री अमृता खानविलकरचं एक स्टेटमेन्ट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. अमृता नेमकं कशाबद्दल बोलली आहे?
advertisement
1/8

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर. अमृता आतपर्यंत अनेक सिनेमांत काम केलं आहे. तिनं अनेक डान्स रिअलिटी शोमध्ये देखील काम केलं आहे.
advertisement
2/8
अमृता सध्या 'लग्न पंचमी' या नाटकातून मराठी रंगभूमीवर काम करतेय. दरम्यान अमृताचं एक वक्तव्य समोर आलं आहे ज्याची खूप चर्चा होत आहे. 'काही गोष्टी पडद्यामागेच चांगल्या असतात' असं अमृतानं म्हटलं आहे. अमृताने हे नेमकं कशाबद्दल म्हटलं आहे?
advertisement
3/8
अमृताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तिला घरातून एका विशिष्ट शोमध्ये जाण्यासाठी स्पष्ट नकार आहे. त्या शोमध्ये ती कधीच जाणार नाही असं तिनं सांगितलं.
advertisement
4/8
हा शो म्हणजेच बिग बॉस. अमृताला कधीच टेलिव्हिजनच्या हाय TRP असलेल्या बिग बॉस या रिअलिटी शोमध्ये जायचं नाहीये. अमृता म्हणाली, "मला घरातून फक्त या शोमध्ये जाण्यासाठी नकार आहे. त्यांना असं वाटतं की मी जर बिग बॉसमध्ये गेले तर एकतर कोणाला तरी मारेन तरी किंवा मार खाऊन तरी येईन."
advertisement
5/8
"मी तर कोणाकडून मार खाऊन घेणार नाही, हे तर खरं आहे. पण मला हे करायचं नाही. काही गोष्टी या पडद्यामागेच चांगल्या असतात."
advertisement
6/8
बिग बॉससारख्या शोमध्ये स्पर्धकांना 100 दिवस एकत्र राहावं लागतं. त्यांच्यात सतत मतभेद, वाद आणि इमोशनल ब्रेक डाऊन्स होत असतात. त्यामुळेच अमृताला अशा शोमध्ये सहभाग घेणं आवडत नसावं.
advertisement
7/8
अमृता खानविलकर ही अशी अभिनेत्री आहे जी अभिनयाबरोबर डान्स आणि स्टेज प्रेझेन्समुळेही ओळखली जाते. तिच्या कारकिर्दीत तिने अनेक चित्रपट आणि शोमधून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे रिअॅलिटी शोमध्ये जाऊन वादात अडकण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं तिला अधिक योग्य वाटतं.
advertisement
8/8
तिच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. काही चाहत्यांनी तिच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे, तर काहींनी तिला बिग बॉसमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र अमृताच्या मते प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर मांडणं आवश्यक नसतं. काही गोष्टी पडद्यामागेच राहिल्यास चांगल्या असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Amruta Khanvilkar : 'काही गोष्टी पडद्यामागेच चांगल्या असतात', नेमकं कशाबद्दल बोलतेय अमृता खानविलकर?