प्रकल्पाचे स्वरूप आणि खर्च
केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२५ मध्ये या मार्गांना हिरवा कंदील दाखवला होता. आता राज्याच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
हडपसर ते खडकवासला: २५.५ कि.मी. अंतराच्या या मार्गावर २२ स्थानके असतील. तर, माणिकबाग ते नळस्टॉ या ६.१२ कि.मी.च्या या उपमार्गिकेवर ६ स्थानके असणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण ९,८५७.८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी १,२१२ कोटींचा निधी देणार असून, उर्वरित ४,६९४ कोटी रुपये कर्जाच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.
advertisement
वाहतूक कोंडीतून मुक्तता
या नवीन मार्गिकांमुळे पुण्यातील सर्वात गजबजलेल्या परिसरांना मोठा फायदा होणार आहे
सिंहगड रस्ता: माणिकबाग ते नळस्टॉप जोडणीमुळे सिंहगड रस्त्यावरील नोकरदारांचा प्रवास जलद होईल.
हडपसर व सोलापूर रस्ता: हडपसर ते खडकवासला मार्गिकेमुळे पूर्व आणि पश्चिम पुणे मेट्रोने जोडले जाईल.
प्रशासकीय वेग: राज्य सरकारने महामेट्रो आणि केंद्र सरकारसोबत सामंजस्य करार करण्यासही मान्यता दिली असून, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
