TRENDING:

5 वर्षांचा वनवास संपला! 45 नव्या ई-बसमुळे बाणेरसह पुण्यातील या भागातील प्रवाशांची चांदी, कसा मिळणार फायदा?

Last Updated:

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ४५ नवीन ई-बस दाखल झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ४५ नवीन ई-बस दाखल झाल्या आहेत. २०२१ पर्यंत या बस येणे अपेक्षित होते, मात्र 'ई-डेपो'च्या कामातील विलंबामुळे २०२६ साल उजाडले तरी या बसची प्रतीक्षा होती. आता या ४५ बसमुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण हलका होणार असून, उर्वरित ११० बस देखील पुढील दोन महिन्यांत येण्याची शक्यता आहे.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी (फाईल फोटो)
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी (फाईल फोटो)
advertisement

कोणाला आणि कसा होणार फायदा?

१. बाणेर, चऱ्होली आणि माण परिसरातील प्रवाशांना दिलासा:

पुणे स्टेशन, निगडी आणि भेकराईनगर या डेपोंमध्ये आधीच १०० हून अधिक बस कार्यरत होत्या. मात्र, बाणेर, चऱ्होली आणि माण डेपोमध्ये बसची संख्या ५० पेक्षाही कमी होती. नव्या ४५ बस प्रामुख्याने या भागात तैनात केल्या जाणार असल्याने, येथील आयटी कर्मचारी आणि स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

advertisement

२. बससाठीची 'वेटिंग' कमी होणार:

नव्या बस दाखल झाल्यामुळे बसची वारंवारता वाढेल. यामुळे प्रवाशांना थांब्यावर तासन्‌तास उभे राहावे लागणार नाही. विशेषतः गर्दीच्या वेळी प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल.

३. 'ब्लेड टेक्नॉलॉजी'मुळे सुरक्षित प्रवास:

पीएमपीने उर्वरित बसमध्ये अत्याधुनिक 'ब्लेड टेक्नॉलॉजी'च्या बॅटऱ्या बसवण्याची मागणी केली आहे. या तंत्रज्ञानामुळे बॅटरीची क्षमता वाढते आणि सुरक्षितताही अधिक असते. प्रवाशांना आधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल.

advertisement

४. प्रदूषणातून मुक्तता:

शहरातील जुन्या आणि धूर सोडणाऱ्या बसची संख्या कमी होऊन ई-बस वाढल्याने हवेचे प्रदूषण कमी होईल, ज्याचा फायदा संपूर्ण पुणेकरांच्या आरोग्यासाठी होणार आहे.

उर्वरित ११० बसचे काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

पीएमपीला एकूण ६५० बस मिळणार होत्या, त्यापैकी १६० बस येणे बाकी होते. आता आलेल्या ४५ बस वगळता अद्याप ११० बसची प्रतीक्षा आहे. ठेकेदाराने या बस पुढील दोन महिन्यांत 'ब्लेड टेक्नॉलॉजी'सह देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाने डेपो आणि वीज जोडणीचे नियोजन पूर्ण केल्याने आता चेंडू ठेकेदाराच्या कोर्टात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
5 वर्षांचा वनवास संपला! 45 नव्या ई-बसमुळे बाणेरसह पुण्यातील या भागातील प्रवाशांची चांदी, कसा मिळणार फायदा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल