TRENDING:

Shiv Sena : ठाकरे गटाचं शिंदे गटात विलीनीकरण! महापालिका राजकारणात मोठी घडामोड, कुठं बदललं समीकरण?

Last Updated:

Shiv Sena: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन आता महिना उलटला असला तरी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव काही ठिकाणी सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन आता महिना उलटला असला तरी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव काही ठिकाणी सुरू आहे. तर, काही महापालिकांमध्ये चक्रावणारी समीकरणे, आघाडी झाल्याचे दिसून येत आहे. जवळपास मागील तीन-साडेतीन वर्षांपासून एकमेकांना पाण्यात पाहणारे शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाबाबत मोठी घडामोड झाली आहे. ठाकरे गटाने थेट शिंदे गटाच्या आघाडीत विलीनीकरण केलं आहे.
ठाकरे गटाचं शिंदे गटात विलीनीकरण,  महापालिका राजकारणात मोठी घडामोड
ठाकरे गटाचं शिंदे गटात विलीनीकरण, महापालिका राजकारणात मोठी घडामोड
advertisement

अमरावती महानगरपालिकेच्या आगामी स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळत आहेत. सत्ता आणि संख्याबळ वाढवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीमुळे महापालिकेतील चित्र पूर्णपणे बदलले आहे. यात प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेना-बसपा युतीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसचे संख्याबळ वाढलं, वंचितचा पाठिंबा

निवडणुकीच्या तोंडावर 'वंचित बहुजन आघाडी'च्या एका सदस्याने काँग्रेस गटात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेसप्रणीत आघाडीचे संख्याबळ आता १५ वरून १६ झाले आहे. या वाढीव संख्याबळामुळे काँग्रेसला आता गणितानुसार २ स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी ही संख्या केवळ एका सदस्यापुरती मर्यादित होती.

advertisement

शिवसेना ठाकरे गटाचे विलीनीकरण

दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन सदस्यांनी 'शिवसेना-बसपा' आघाडीत विलीनीकरण केले आहे. या विलीनीकरणामुळे या संयुक्त गटाची सदस्यसंख्या आता ८ झाली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाच्या या सदस्यांना सोबत घेण्यासाठी राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, सदस्यसंख्या ८ झाली असली तरी तांत्रिक गुणांकनानुसार या गटाचा केवळ एकच सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त होऊ शकणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

या राजकीय खेळींमुळे अमरावती महापालिकेत स्थायी समिती सभापती आणि स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग आता अधिक रंजक झाला असून, कोणाचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena : ठाकरे गटाचं शिंदे गटात विलीनीकरण! महापालिका राजकारणात मोठी घडामोड, कुठं बदललं समीकरण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल