IND vs SA : अभिषेक शर्मा OUT, संजू सॅमसन IN... साऊथ अफ्रिकाविरुद्ध दोन मोठे बदल, व्हाईस कॅप्टनची हकालपट्टी होणार? पाहा प्लेईंग इलेव्हन
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India playing XI for India vs South Africa Super 8 : लीग स्टेजमधील तिन्ही मॅचेसमध्ये अभिषेक ओपनर म्हणून खेळला, पण दुर्दैवाने त्याला एकही रन बनवता आली नाही. सलग 3 मॅचेसमध्ये 0 वर आऊट झाल्यामुळे आता सुपर-8 च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या जागेवर टांगती तलवार आहे.
advertisement
1/7

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय टीमने सुपर-8 मध्ये धडक मारली असली तरी, ओपनिंग जोडीची डोकेदुखी कायम आहे. युवा बॅटर अभिषेक शर्मासाठी ही स्पर्धा आतापर्यंत एखाद्या भयानक स्वप्नासारखी ठरली.
advertisement
2/7
लीग स्टेजमधील तिन्ही मॅचेसमध्ये अभिषेक ओपनर म्हणून खेळला, पण दुर्दैवाने त्याला एकही रन बनवता आली नाही. सलग 3 मॅचेसमध्ये 0 वर आऊट झाल्यामुळे आता सुपर-8 च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या जागेवर टांगती तलवार आहे.
advertisement
3/7
अभिषेक शर्माच्या या खराब फॉर्ममुळे टीम मॅनेजमेंट आता संजू सॅमसनच्या नावाचा गांभीर्याने विचार करत आहे. अभिषेकच्या अनुपस्थितीत नामिबियाविरुद्धच्या मॅचमध्ये सॅमसनला संधी मिळाली होती, जिथं त्याने 22 रन्सची खेळी केली.
advertisement
4/7
जरी ही खेळी मोठी नसली, तरी अभिषेकच्या सलग तीन शून्यांच्या तुलनेत सॅमसनचा परफॉर्मन्स सरस मानला जात आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि कोच यांच्यासमोर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचपूर्वी निवडीचे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
advertisement
5/7
अभिषेक शर्माचा हा पहिलाच टी20 वर्ल्ड कप असून त्याला अद्याप या स्पर्धेत खातंही उघडता आलेले नाही, ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. दुसरीकडे, संजू सॅमसननेही आपली जागा पूर्णपणे पक्की केलेली नाही, ज्यामुळे ही निवड करणे सोपे नसेल.
advertisement
6/7
टीम इंडियामध्ये आणखी एक बदल होण्याची शक्यता आहे. ती म्हणजे व्हाईस कॅप्टन अक्षर पटेलच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. त्याला ग्रुप स्टेजमध्ये एकही सामना खेळता आला नव्हता.
advertisement
7/7
दरम्यान, 22 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर-8 चा थरार रंगणार आहे. या हाय-व्होल्टेज मॅचसाठी भारतीय टीममध्ये कोणकोणते बदल होतात, याची चर्चा होताना दिसतीये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : अभिषेक शर्मा OUT, संजू सॅमसन IN... साऊथ अफ्रिकाविरुद्ध दोन मोठे बदल, व्हाईस कॅप्टनची हकालपट्टी होणार? पाहा प्लेईंग इलेव्हन