केरळमधील प्रसिद्ध पेय कुल्की पुण्यात, एकाच ठिकाणी मिळतायत तब्बल 15 प्रकार, हे आहे लोकेशन
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
आरोग्यदायी आणि नैसर्गिक पेयांचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा व्यवसाय सुरू करण्यात आला. सॅम जिथ यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात येऊन हा व्यवसाय उभा केला.
advertisement
1/5

पुण्यात नेहमीच वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. त्यामध्ये नेहमीच नवीन पदार्थांची भर पडत असते. आता त्याच यादीत केरळमधील प्रसिद्ध पेय कुल्कीची भर पडली आहे. फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरात असलेल्या Firstlees या ठिकाणी हे पारंपरिक केरळी पेय पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
2/5
पुण्यात या पदार्थाची सुरुवात केरळचे असलेले सॅम जिथ आणि मेघालयाची फर्स्टली या दोघांनी मिळून केली. 2023 साली पुण्यात फर्स्टलीज या व्यवसायाची सुरुवात झाली. आरोग्यदायी आणि नैसर्गिक पेयांचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा व्यवसाय सुरू करण्यात आला. सॅम जिथ यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात येऊन हा व्यवसाय उभा केला. सध्या या ठिकाणी अनेक नाविन्यपूर्ण पेये ग्राहकांना मिळत आहेत.
advertisement
3/5
कुल्की केरळमधील लोकप्रिय पेय मानले जाते. यामध्ये कोवळ्या नारळाची मलई, गाईचे दूध यांचे मिश्रण करून हे पेय तयार केले जाते. यात कोणतेही अतिरिक्त कृत्रिम साखर किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्ज वापरले जात नाहीत, त्यामुळे हे पेय आरोग्यदायी पर्याय म्हणूनही ओळखले जाते. हे बनवताना काही पेयांमध्ये ताज्या फळांचा आणि सुकामेव्याचाही वापर केला जातो. यासाठी लागणारे काही घटक दक्षिण भारतातील राज्यांमधून आणले जातात, तर सुकामेवा अफगाणिस्तानमधून मागवला जातो.
advertisement
4/5
सॅम जिथ कुल्कीचे तब्बल 15 वेगवेगळे प्रकार या ठिकाणी विकतात. त्यामध्ये ओरिओ कुल्की, चॉकलेट कुल्की, कॉफी कुल्की, केळी कुल्की, पपई कुल्की, खरबूज कुल्की अशा विविध फ्लेवर्सचा समावेश आहे. तसेच साबुदा, मसूरा, कन्नूर कॉकटेल आणि अबुदा यांसारखी वेगळी पेयेही येथे मिळतात. याशिवाय आंबा, तुती, पेरू आणि इतर फळांपासून तयार केलेले फ्रूट शेकदेखील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
advertisement
5/5
या ठिकाणी दररोज सुमारे 300 ते 400 ग्लास कुल्कीची विक्री होते. कुल्कीची किंमत 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत असल्याने विद्यार्थी आणि तरुण वर्गामध्येही याची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. केरळमधील पारंपरिक पेय कुल्कीनेही आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, येत्या काळात या पेयाची लोकप्रियता आणखी वाढताना पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
केरळमधील प्रसिद्ध पेय कुल्की पुण्यात, एकाच ठिकाणी मिळतायत तब्बल 15 प्रकार, हे आहे लोकेशन