TRENDING:

जे कोणालाच जमलं नाही, ते 'हमजा'ने करून दाखवलं! बॉक्स ऑफिसवर Dhurandhar 2 चा डंका, 4 दिवसात रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

Last Updated:
Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' प्रत्येक दिवशी वेगवेगळे रेकॉर्ड्स मोडत आहे. अशातच आता धुरंधरने एक नवा इतिहास रचला आहे.
advertisement
1/8
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चा डंका! ओपनिंग वीकमध्येच केली बजेटच्या तिप्पट कमाई
मुंबई : धुरंधर २ बॉक्स ऑफिसवर कमालच केली आहे. या फिल्मने चार दिवसात जे करून दाखवलं आहे, ते पाहून भल्याभल्यांचे डोळे पांढरे झाले आहेत.
advertisement
2/8
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' प्रत्येक दिवशी वेगवेगळे रेकॉर्ड्स मोडत आहे. अशातच आता धुरंधरने एक नवा इतिहास रचला आहे.
advertisement
3/8
धुरंधरच्या पहिल्या भागाची कमाई पाहता, या फिल्मचा दुसरा भागही मोठा धमाका करणार यात शंकाच नव्हती. मात्र रिलीजच्या पहिल्याच वीकेंडमध्ये धुरंधरने जी कमाल करून दाखवली आहे, ती आजवर कोणत्याही बॉलिवूड फिल्मला जमलेली नाही.
advertisement
4/8
धुरंधर २ ने ओपनिंग वीकेंडला जगभरात तब्बल ७६१ कोटी रुपयांचा आकडा पार करून नवा बेंचमार्क सेट केला आहे. या चित्रपटाने गुरुवारी पेड प्रिव्ह्यू आणि पहिल्या दिवसातच भारतात १४५ कोटी तर परदेशात ५२ कोटींची कमाई करत धमाकेदार सुरुवात केली.
advertisement
5/8
शुक्रवारी या वेगाला थोडी विश्रांती मिळाली असली तरी, शनिवारी आणि रविवारी पुन्हा एकदा कमाईचा धमाका पाहायला मिळाला. शनिवारी भारतात ११७ कोटी आणि परदेशात ५८ कोटी, तर रविवारी विक्रमी १२१ कोटी भारतात आणि ५६ कोटी परदेशात अशी कमाई झाली.
advertisement
6/8
अवघ्या चार दिवसांत या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ४६६ कोटी आणि जगभरातून ७६१ कोटींचा गल्ला जमवून तो ब्लॉकबस्टर ठरला आहे. इतकंच नाही, तर धुरंधरने नवे विक्रमही तयार केले आहेत.
advertisement
7/8
धुरंधर हा भारतात सर्वात वेगाने ३०० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला असून, बुक माय शो या प्लॅटफॉर्मवर एका तासात तब्बल १.०९ लाख तिकीटं विकली जाण्याचा जागतिक विक्रमही या चित्रपटाच्या नावावर झाला आहे.
advertisement
8/8
परदेशातही या चित्रपटाची क्रेझ प्रचंड असून, युक्रेन, बल्गेरिया, चिली आणि मेक्सिको सारख्या देशांतही वाढत्या मागणीमुळे हा चित्रपट २२०० पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जे कोणालाच जमलं नाही, ते 'हमजा'ने करून दाखवलं! बॉक्स ऑफिसवर Dhurandhar 2 चा डंका, 4 दिवसात रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल