TRENDING:

Women Health : तिशीनंतर महिलांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग का असतं गरजेचं? 'या' सोप्या पद्धतीनं करू शकता सुरूवात..

Last Updated:
Strength Training Importance : अनेक अभिनेत्री आणि फिटनेस कोच यांचं मत आहे की, महिलांनी तिशीनंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला हवं. कारण यामुळे त्यांचे शरीर आणि एकूणच आरोग्य दीर्घकाळ चांगलं राहातं. स्ट्रेंथ ट्रेनिंगचे फायदे आणि सुरुवात कशी करायची पाहूया.
advertisement
1/9
तिशीनंतर महिलांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग का असतं गरजेचं? 'या' सोप्या पद्धतीनं करू शकता सुरूवात..
महिलांच्या शरीरात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक प्रकारचे बदल होत असतात. त्यामुळे एका विशिष्ट वयानंतर जास्त काळजी घेण्याची गरज असते. तिशीनंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यानेही शरीर आणि एकूण आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
advertisement
2/9
महिलांच्या शरीरात तिशीनंतर महिला स्नायूंचं प्रमाण म्हणजेच मसल्सचं प्रमाण कमी होऊ लागतं. स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने ही प्रक्रिया मंद म्हणजेच स्लो होते. त्याचबरोबर नवीन मसल्सदेखील तयार होऊ लागतात. यामुळे दीर्घकाळ शरीर मजबूत राहण्यास मदत होते.
advertisement
3/9
मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेन हार्मोन कमी होऊ लागते. महिलांच्या हाडांची घनता कमी होण्याचा वेगही वाढतो. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे ही प्रक्रियासुद्धा स्लो होते आणि हाडं मोडण्याचा धोका कमी होतो.
advertisement
4/9
तिशीनंतर बहुतेक महिलांना वजन कमी करण्यासाठी खूप पर्यंत करावे आणि तरीही कित्त्येकदा यश येत नाही. हे पचनक्रिया मंदावल्यामुळे होते. अशावेळीही स्ट्रेंथ ट्रेनिंग आवश्यक असते. कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने मसल्स वाढतात आणि मसल्स चरबीपेक्षा जास्त कॅलरीज जाळतात. याचा अर्थ तुमच्या शरीरात जितके जास्त लीन मसल्स असतील, तितक्या जास्त कॅलरीज तुमचे शरीर जाळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement
5/9
स्ट्रेंथ ट्रेनिंगचा फायदा केवळ आपल्या बाह्य शरीराला होत नाही तर आपल्या मेंदूलाही होतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोनचे प्रमाण वाढते. हे हार्मोन तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते.
advertisement
6/9
स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळे शरीराची इन्सुलिन सिन्सिटिव्हिटीदेखील सुधारते. याचा फायदा असा होतो की, तुम्हाला पीसीओडी आणि टाइप 2 डायबिटीज असे आजार होण्याचा धोका कमी होतो.
advertisement
7/9
हल्ली बहुतांश लोकांचे काम एकाजागी बसून असते किंवा ज्यांचे काम बसून असते, त्या लोकांनी तर स्ट्रेंथ ट्रेनिंग करायलाच हवी. कारण तुमच्या दुखत असलेल्या पाठ आणि मानेला आराम मिळू शकतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने तुमचे मुख्य स्नायू म्हणजेच कोर मसल्स मजबूत होतात. तुमचे पोश्चर सुधारते आणि जुनाट वेदनाही कमी होतात.
advertisement
8/9
स्ट्रेंथ ट्रेनिंगला सुरवात कधी करावी हा बऱ्याच लोकांच प्रश असतो. त्यासाठी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत. स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना पहिल्याच दिवशी जड डबल्स उचलू नका. त्याऐवजी आधी बॉडीवेट व्यायाम करा. जसे की पुश-अप्स, स्क्वॅट्स आणि प्लँक्स. त्यानंतर काहुळाळू रेझिस्टन्स बँड्सकडे जा. हे तुमच्या सांध्यांसाठी सोपे असतात आणि मसल्स टोन करतात.
advertisement
9/9
शरीराला थोडी सवय लागल्यानंतर हलके वजन उचलायला सुरुवात करा. सुरुवातील 1-2 किलोचे डबल्स उचला. तुम्ही आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची सवय लावा. सुरुवातीला एवढा कालावधी पुरेसा आहे. व्यायामानंतर शरीराला रिकव्हर होण्यासाठीही वेळ द्या. हे जास्त गरजेचं आहे. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Women Health : तिशीनंतर महिलांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग का असतं गरजेचं? 'या' सोप्या पद्धतीनं करू शकता सुरूवात..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल