Health Tips : सतत चिंता अन् थकवा, वेळीच व्हा सावध, नाहीतर जावे लागेल गंभीर परिणामांना सामोरे
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
डिप्रेशन म्हणजे केवळ दुःख किंवा नैराश्य नव्हे, तर ते मन, विचार आणि शरीर यांच्यावर परिणाम करणारा मानसिक आजार आहे. यात व्यक्तीला जीवनात आनंद वाटत नाही, झोप कमी होते, भूक मंदावते आणि आत्मविश्वास कमी होतो.
advertisement
1/7

सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर मानसिक आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. याला कारण म्हणजे जीवनातील स्पर्धा, अपयश, आर्थिक अडचणी आणि सामाजिक दडपण यामुळे अनेकजण तणाव आणि डिप्रेशनच्या विळख्यात सापडत आहेत.
advertisement
2/7
डिप्रेशन म्हणजे केवळ दुःख किंवा नैराश्य नव्हे, तर ते मन, विचार आणि शरीर यांच्यावर परिणाम करणारा मानसिक आजार आहे. यात व्यक्तीला जीवनात आनंद वाटत नाही, झोप कमी होते, भूक मंदावते आणि आत्मविश्वास कमी होतो. याबद्दलची माहिती डॉक्टर नागेश पाठक यांनी दिली आहे.
advertisement
3/7
डॉक्टर नागेश पाठक सांगतात की, तणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग असतो, परंतु तो वाढून मानसिक संतुलन बिघडवू लागला तर तो धोकादायक ठरतो. यामध्ये सतत चिंता, कामगिरीबाबतची भीती, घरगुती वाद किंवा आर्थिक अस्थिरता यामुळे तणाव वाढतो. त्यामुळे हा तणाव दीर्घकाळ राहिला तर तो हळूहळू डिप्रेशनमध्ये रूपांतरित होऊ शकतो. त्यामुळे तणावाची प्रारंभिक लक्षणे ओळखून वेळेत उपाय करणे अत्यावश्यक ठरते.
advertisement
4/7
डिप्रेशनमध्ये सतत दुःखी राहणे, आवडत्या गोष्टींमध्ये रस न उरणे, थकवा जाणवणे, निर्णय घेण्यास अडचण येणे आणि आत्महत्येचे विचार मनात येणे, ही लक्षणे आढळतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. मानसिक आजारांबाबत समाजात असलेली लाज किंवा गैरसमज दूर करणे हे देखील आजच्या काळाचे मोठे आव्हान आहे.
advertisement
5/7
उपाययोजनेच्या दृष्टीने, नियमित व्यायाम, ध्यान, योग आणि पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. कुटुंबीय आणि मित्रांसोबत संवाद ठेवणे, आवडीचे छंद जोपासणे आणि स्वतःसाठी वेळ देणे यामुळे मन हलके होते. काही वेळा औषधोपचाराचीही आवश्यकता भासते, परंतु ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावेत.
advertisement
6/7
डिप्रेशनला आणि तणावाला कमजोरी म्हणून पाहू नये. हे आजार देखील इतर शारीरिक आजारांप्रमाणेच उपचारयोग्य आहेत.
advertisement
7/7
त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढा, कारण निरोगी मनातच आनंदी जीवनाचे खरे सार दडलेले असते, असं डॉक्टर नागेश पाठक सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : सतत चिंता अन् थकवा, वेळीच व्हा सावध, नाहीतर जावे लागेल गंभीर परिणामांना सामोरे