बुधाची बदलली चाल! 4 राशींवर होणार उलट परिणाम, 29 जूनपर्यंत एक चूकही पडणार महागात
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
बुध जेव्हा सरळ चालीने चालतो, तेव्हा त्याचे शुभ फळ सर्वांना मिळते, असे मानले जाते. मात्र, यावेळी बुधाची ही चाल 29 जून 2026 पर्यंत विशिष्ट राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
advertisement
1/5

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह 21 मार्च 2026 रोजी कुंभ राशीत 'मार्गी' झाला आहे. बुध जेव्हा सरळ चालीने चालतो, तेव्हा त्याचे शुभ फळ सर्वांना मिळते, असे मानले जाते. मात्र, यावेळी बुधाची ही चाल 29 जून 2026 पर्यंत विशिष्ट राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
advertisement
2/5
कर्क - आर्थिक व्यवहार आणि आरोग्याची काळजी: कर्क राशीच्या जातकांसाठी बुध अष्टम भावात मार्गी झाला आहे. यामुळे अचानक धनहानी होण्याचे योग आहेत. 29 जूनपर्यंत कोणालाही मोठे कर्ज देऊ नका किंवा जामीनदार राहू नका. घाईघाईत घेतलेले निर्णय भयंकर नुकसानीस कारणीभूत ठरू शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः पोटाचे विकार त्रास देऊ शकतात.
advertisement
3/5
कन्या - खर्चात वाढ आणि कौटुंबिक तणाव: कन्या राशीचा स्वामी बुध असून तो सहाव्या भावात मार्गी आहे. यामुळे तुमचे खर्च अनपेक्षितपणे वाढू शकतात, ज्यामुळे बजेट बिघडेल. घरातील सदस्यांशी विनाकारण खटके उडू शकतात. नोकरीमध्ये तुमच्या कामावर टीका होऊ शकते, त्यामुळे बोलताना संयम बाळगा. हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा असेल.
advertisement
4/5
वृश्चिक - मालमत्तेचे वाद आणि करिअरमध्ये अडथळे: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध चौथ्या भावात मार्गी आहे. जमिनीशी संबंधित व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कागदपत्रे नीट तपासा. करिअरमध्ये प्रगतीची गती मंदावू शकते. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. घरातील सुख-शांती टिकवण्यासाठी वादाचे मुद्दे टाळणे हिताचे ठरेल.
advertisement
5/5
मीन - मानसिक गोंधळ आणि फसवणूक: मीन राशीच्या लोकांसाठी बुध बाराव्या भावात मार्गी आहे. यामुळे तुमच्या मनात सतत भीती किंवा गोंधळ राहील. परदेशाशी संबंधित कामात अडथळे येऊ शकतात. जवळच्या व्यक्तीकडूनच आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. गुंतवणुकीचे निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
बुधाची बदलली चाल! 4 राशींवर होणार उलट परिणाम, 29 जूनपर्यंत एक चूकही पडणार महागात