लहानपणीच महिलेवर अत्याचार, नातेवाईकांनी हाकललं, जहाजावर काम, नंतर ज्योतिषविद्येने फेमस, कॅप्टन खरातचा इतिहास
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अशोक खरात याने नौदलात २० वर्ष सेवा केल्याचे सांगण्यात आले. तो कॅप्टन पदावरून निवृत्त झाल्याचेही सांगितले गेले. परंतु हे सर्व खोटे असून लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्याने स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेतले.
advertisement
1/7

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटक असलेल्या अशोक खरात याच्याबद्दल देशभरात चर्चा सुरू आहे. जेमतेम शिक्षण असलेल्या भोंदूबाबाने राजकारणी, मंत्री, अधिकाऱ्यांना कसे गळाला लावले, शेकडो महिलांना आपल्या जाळ्यात कसे ओढले, त्याची गुन्हे करण्याची पद्धती काय होती, तो मूळचा कुठला आहे? ज्योतिषविद्या करण्याआधी तो नेमका काय करायचा, अशी चर्चा नाक्यानाक्यावर सुरू आहे.
advertisement
2/7
महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केले असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. संवेदनशील आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखालील विशेष पोलीस पथकाकडून अर्थात एसआयटीकडून त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीत वेगवेगळी माहिती समोर येत आहे.
advertisement
3/7
अशोक खरात याने नौदलात २० वर्ष सेवा केल्याचे सांगण्यात आले. तो कॅप्टन पदावरून निवृत्त झाल्याचेही सांगितले गेले. परंतु हे सर्व खोटे असून लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्याने स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेतले. तो जहाजावर मजूर म्हणून कामाला होता, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
4/7
अशोक खरात याच्या आयुष्यातला काळा इतिहास समोर आला असून अल्पवयीन असतानाच त्याने कुकर्म केले होते, असे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्याने घराचे नाव बदनाम केल्यामुळे नातेवाईकांनी चोप दिला. झालेल्या बेईज्जतीमुळे खरात त्याच्या मूळ गावातून पसार झाला.
advertisement
5/7
त्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्याने मालवाहू जहाजांवर मजूर, खानसामा म्हणून नोकरी केली. त्यानंतर थायलंडमध्ये तो गुन्हेगारांच्या संपर्कात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. थायलंडमध्ये महिलांच्या तस्करीत काही भारतीयांना अटक झाली. त्यावेळी भोंदू खरात हा महिलांच्या तस्करीत सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. यासंबंधाने पोलीस त्याची अधिक चौकशी करीत आहेत.
advertisement
6/7
कष्टाच्या जीवनानंतर त्याने अल्पावधीत श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून ज्योतिषविद्येचे शिक्षण घेतले. छोटे मोठे उद्योजक, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक अशा मंडळींचे भविष्य पाहायला त्याने सुरुवात केली. गेल्या काही वर्षांपासून अडल्या नडलेल्यांचे भविष्य पाहून त्यांना मार्ग दाखविण्याचा दावा अशोक खरात करीत होता. मात्र २०२२ साली राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नरच्या मिरगावात जाऊन पूजाविधी केल्यानंतर अशोख खरात याचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. तेल्हापासून अशोक खरात याने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते अशोक खरात याच्याकडे जाऊ लागले. प्रशासनातील बडे अधिकारी, पोलीस खात्यातील अधिकारी, उद्योजक, चित्रपट सृष्टीतील कलाकार आदी मान्यवरांचा खरातकडे राबता वाढला.
advertisement
7/7
या माध्यमातून त्याने शेकडो कोटींची माया जमवली. नाशिक, पाथर्डी, सिन्नर, शिर्डी आदी भागांत त्याने कोट्यवधी रूपयांच्या जमिनी घेतल्या. मिरगावात त्याने अलिशान फार्महाऊस बांधले. कित्येक कोटींची माया जमवलेल्या भोंदू खरातने विदेशात लक्झरी जीवन जगत असतानाचे फोटो व्हायरल समोर आले आहेत. खरातचे दक्षिण कोरियातील फोचो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कुटुंबासोबत परदेशात मौजमजा करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे भविष्य पाहणाऱ्या कॅप्टनचे भविष्य मात्र सध्या अंधारात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
लहानपणीच महिलेवर अत्याचार, नातेवाईकांनी हाकललं, जहाजावर काम, नंतर ज्योतिषविद्येने फेमस, कॅप्टन खरातचा इतिहास