TRENDING:

Success Story : इतरांच्या शेतात मजुरी केली अन् घेतला निर्णय, भुईमुग शेतीतून नशीब पालटलं, 6 लाख रुपयांचा नफा

Last Updated:
मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेती केल्यास चांगला नफा मिळवता येतो. हे बीडमधील शेतकरी रवी पवार यांनी दाखवून दिलं आहे.      
advertisement
1/7
इतरांच्या शेतात मजुरी केली अन् घेतला निर्णय, भुईमुग शेतीतून नशीब पालटलं, 6 लाख रुपयांचा नफा
शेती हा तसं पाहिलं गेलं तर तोट्यात जाणारा व्यवसाय आहे. पण मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेती केल्यास चांगला नफा मिळवता येतो. हे बीडमधील शेतकरी रवी पवार यांनी दाखवून दिलं आहे. <span style="font-size: 20px;"> </span> <span style="font-size: 20px;"> </span> <span style="font-size: 20px;"> </span>
advertisement
2/7
शेतकरी रवी पवार यांना केवळ दोन एकर शेती असतानाही भुईमुगाच्या पिकातून ते लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. काही वर्षांपूर्वी इतरांच्या शेतात मजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, आता योग्य नियोजनातून भुईमूग शेती करून ते चांगला नफा मिळवत आहेत.
advertisement
3/7
मजुरी करत असताना आपणही स्वतः काहीतरी करू शकतो. या विचाराने पैसे साठवण्यास सुरुवात केली.
advertisement
4/7
अनेक वर्षांच्या कष्टातून भांडवल उभे केले आणि स्वतःच्या शेतीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. कोरडवाहू शेतात बोअरवेल खोदून पाण्याची सोय निर्माण केली, ज्यामुळे शेती उत्पादनक्षम झाली, असं शेतकरी रवी पवार सांगतात.
advertisement
5/7
रवी पवार यांनी पाणी उपलब्ध झाल्यानंतर पहिल्याच हंगामात भुईमुगाची लागवड केली. योग्य नियोजन, खत व्यवस्थापन आणि वेळेवर देखभाल यामुळे चांगले उत्पादन मिळाले. पहिल्या हंगामातील यश पाहून दुसऱ्या हंगामातही भुईमुगाची लागवड केली. त्यातूनही चांगले उत्पन्न निघाले, असे पवार सांगतात.
advertisement
6/7
दोन हंगामातील यशामुळे रवी पवार यांचा आत्मविश्वास वाढला असून पहिल्याच वर्षी दोन्ही हंगाम मिळून सुमारे सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. याच पद्धतीने शेती करत त्यांनी दरवर्षी भुईमुगाची लागवड सुरू ठेवली. यंदा देखील त्यांनी भुईमुगाच्या माध्यमातून सुमारे सहा लाख रुपयांचा नफा मिळवला असल्याचे सांगितले.
advertisement
7/7
सध्या त्यांच्या दोन एकर शेतीपैकी एक एकर क्षेत्र कोरडवाहू असून दुसऱ्या एकरमध्ये पाण्याची सोय आहे. पाण्याचा योग्य वापर आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांनी शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवण्याचा मार्ग शोधला आहे. रवी पवार यांची ही यशोगाथा कमी क्षेत्रातही योग्य नियोजन आणि मेहनतीने मोठे यश मिळवता येते, हे अधोरेखित करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : इतरांच्या शेतात मजुरी केली अन् घेतला निर्णय, भुईमुग शेतीतून नशीब पालटलं, 6 लाख रुपयांचा नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल