Success Story : 26 वर्षांची मेहनत अखेर लिंबाने केलं लखपती, आतापर्यंत 8000000 कमाई
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
2000 साली एका एकरात लिंबूची लागवड केली होती. तब्बल 26 वर्षांनंतरही ही बाग त्यांना दरवर्षी लाखोंचे उत्पन्न देत आहे.
advertisement
1/7

शेती हा तसं पाहायला गेलं तर तोट्यात जाणारा व्यवसाय आहे. पण योग्य नियोजन केलं तर भरघोस उत्पन्न मिळू शकते.
advertisement
2/7
शेतकरी प्रदीप हरिदास सरवळे यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी 2000 साली एका एकरात लिंबूची लागवड केली होती. तब्बल 26 वर्षांनंतरही ही बाग त्यांना दरवर्षी लाखोंचे उत्पन्न देत आहे.
advertisement
3/7
प्रदीप सरवळे यांनी एका एकरात 16 बाय 16 या अंतरावर लिंबूच्या झाडांची लागवड 2000 साली केली. त्यांनी लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून खड्ड्यांमध्ये शेणखत टाकले.
advertisement
4/7
त्यानंतर झाडे लावण्यात आली. या लागवडीसाठी त्यावेळी सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा खर्च आला होता. सुरुवातीच्या दोन वर्षांत बागेतून फारसे उत्पन्न मिळाले नाही.
advertisement
5/7
मात्र झाडी मोठी झाल्यानंतर उत्पादनही वाढू लागले. त्यांचा दोन वर्षांतच बागेवरील संपूर्ण खर्च निघून गेला. त्यानंतर दरवर्षी लिंबाच्या बागेतून सरासरी साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळू लागले. कमी खर्चात सातत्याने उत्पन्न देणारे पीक म्हणून लिंबूची बाग प्रदीप सरवळे यांच्यासाठी फायदेशीर ठरली आहे.
advertisement
6/7
या लिंबाची ते गावातच व्यापारी असल्यामुळे त्यांना विक्री करतात. व्यापारी थेट बागेत येऊन लिंबांची पाहणी करतात आणि माल खरेदी करून घेऊन जातात. त्यामुळे वाहतूक आणि बाजारपेठेची अडचणही कमी झाली आहे. त्यांच्या लिंबूच्या बागेला आज 26 वर्षे पूर्ण झाली असून आतापर्यंत या बागेतून प्रदीप सरवळे यांना सुमारे 70 ते 80 लाख रुपयांपर्यंत नफा मिळाला आहे.
advertisement
7/7
शेतकरी प्रदीप सरवळे सांगतात की, शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत फळबागांचा विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी शेतात दहा गुंठे जरी लिंबूची लागवड केली तरी चांगले उत्पन्न मिळू शकते आणि आर्थिक अडचणीपासून मोठा आधार मिळू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : 26 वर्षांची मेहनत अखेर लिंबाने केलं लखपती, आतापर्यंत 8000000 कमाई