TRENDING:

चना भटूरा ते दही वडा,150 पदार्थांसाठी प्रसिद्ध पुण्यातील ठिकाण, खवय्यांची जिंकलीत मन

Last Updated:
गेल्या 50 वर्षांपासून पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरले आहे. 1976 साली सीतल आहुजा यांनी एका छोट्याशा ज्यूस बारपासून सुरू केलेला हा प्रवास आज भव्य फूड डेस्टिनेशनमध्ये रूपांतरित झाला आहे.
advertisement
1/7
चना भटूरा ते दही वडा,150 पदार्थांसाठी प्रसिद्ध पुण्यातील ठिकाण, खवय्यांची जिंकलीत मन
पुणे शहराची ओळख सांगणाऱ्या खाद्यसंस्कृतीत अनेक नामांकित ठिकाणांचा समावेश होतो. त्यापैकी प्रभात रोडवरील दर्शन ज्यूस बार हे गेल्या 50 वर्षांपासून पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरले आहे. 1976 साली सीतल आहुजा यांनी एका छोट्याशा ज्यूस बारपासून सुरू केलेला हा प्रवास आज भव्य फूड डेस्टिनेशनमध्ये रूपांतरित झाला आहे.
advertisement
2/7
यंदा या व्यवसायाने सुवर्णमहोत्सव साजरा करत यशस्वी 50 वर्षांचा टप्पा गाठला आहे. सुरुवातीला केवळ ज्यूस बार म्हणून सुरू झालेल्या दर्शनमध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार पदार्थांची भर पडत गेली.
advertisement
3/7
सँडविच ज्यूस पासून सुरुवात करत आज येथे 150 हून अधिक पदार्थ उपलब्ध आहेत. ग्राहकांना जे बाहेर सहज मिळत नाही, असे वेगळे आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेले पदार्थ देण्यावर भर देण्यात आला.
advertisement
4/7
कॅरमल कस्टर्ड, चना भटूरा, दही वडा यांसारख्या पदार्थांनी ग्राहकांची मनं जिंकली. या व्यवसायामागे केवळ नफा नाही, तर समाजाभिमुख दृष्टिकोनही आहे.
advertisement
5/7
त्या काळात विद्यार्थ्यांसाठी पार्ट-टाईम नोकरीच्या संधी कमी होत्या. कमवा आणि शिका या संकल्पनेतून अनेक विद्यार्थ्यांना येथे कामाची संधी देण्यात आली. आतापर्यंत 100 ते 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी येथे काम करत शिक्षण पूर्ण केले असून आज ते विविध क्षेत्रात यशस्वी आहेत.
advertisement
6/7
काळानुसार व्यवसायातही बदल करण्यात आले. दुसऱ्या पिढीतील कुणाल आणि विशाखा यांनी आधुनिक व्यवस्थापनाची जोड देत 2018 मध्ये बाणेर येथे दुसरी शाखा सुरू केली. आज प्रभात रोड आणि बाणेर या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे 100 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
advertisement
7/7
1976 साली 2 रुपयांना मिळणारा मोसंबी ज्यूस आज 130 रुपयांपर्यंत पोहोचला असला, तरी चवीत कोणतीही तडजोड न करता दर्शनने ग्राहकांचा विश्वास कायम ठेवला आहे. वार्षिक सुमारे 15 कोटी रुपयांची उलाढाल गाठणारा हा व्यवसाय आजही गुणवत्ता, सचोटी आणि आपुलकीच्या बळावर यशस्वी वाटचाल करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
चना भटूरा ते दही वडा,150 पदार्थांसाठी प्रसिद्ध पुण्यातील ठिकाण, खवय्यांची जिंकलीत मन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल