TRENDING:

एकमेकांना केक भरवला, कॅप्टनच्या पायावर डोकं, अक्षरश: लोटांगण घातलं, चाकणकरांचे नवे फोटो

Last Updated:
Rupali Chakankar: कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्यावर होणाऱ्या आरोपांची मला माहिती नाही असे म्हणणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे आणखी काही फोटो वायरल झाले आहेत.
advertisement
1/7
एकमेकांना केक भरवला, कॅप्टनच्या पायावर डोकं, अक्षरश: लोटांगण घातलं, चाकणकरांचे नवे फोटो
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोंदूबाबा, कॅप्टन अशोक खरात याचे कारनामे समोर आल्यानंतर त्याची राज्यभरात चर्चा होत आहे. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे संविधानिक पदावर असलेल्या रुपाली चाकणकर या खरात अध्यक्ष असलेल्या ट्रस्टवर सदस्या आहेत. अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
advertisement
2/7
कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्यावर होणाऱ्या आरोपांची मला माहिती नाही असे म्हणणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे आणखी काही फोटो वायरल झाले आहेत.
advertisement
3/7
ज्यात कॅप्टन खरात यांच्या एका वाढदिवसाला रूपाली चाकणकर या खरात याला केक भरवताना दिसत आहेत. तसेच दुसऱ्या फोटोत कॅप्टन खरात हा रूपाली चाकणकर यांना केक भरवताना दिसत आहे.
advertisement
4/7
आता या फोटोनंतर तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला माहिती नाही, असे रूपाली चाकणकर यांना कसे म्हणता येईल असा सवाल उपस्थित होत आहे. समाज माध्यमांवरील वेगवेगळ्या फोटोंनंतर चाकणकर आणि खरात यांचे घनिष्ट संबंध होते, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
advertisement
5/7
असे असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही? त्यांना नेमकं कोण वाचवतंय? त्यांच्याकडून महिला आयोगाचे अध्यक्षपद काढून घेणार का? असे सवाल राज्यातील विरोधी पक्षाचे नेते विचारीत आहेत.
advertisement
6/7
खरे तर रुपाली चाकणकर या कॅप्टन खरात यांच्या शिष्या. चाकणकर या खरातला गुरूमाऊली म्हणत. त्यांच्यामुळेच आपणाला आयुष्यात काय करायचे हे कळल्याचे स्वत: त्यांनी भाषणात सांगितले.
advertisement
7/7
चाकणकरांनी अनेकदा खरातच्या पायावर डोकं ठेवलं. वैयक्तिक आयुष्यात त्या खरातचा सल्ला घेत असत, असे सूत्रांनी सांगितले. अनेक महिलांचे शोषण करणारा खरात, याच्यावर चाकणकरांची छत्रछाया आहे, असे बोलले जात असताना त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्रातून होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
एकमेकांना केक भरवला, कॅप्टनच्या पायावर डोकं, अक्षरश: लोटांगण घातलं, चाकणकरांचे नवे फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल