TRENDING:

प्राणी दाखवायला टान्झानियाला नेलं अन् जंगलात केलं प्रपोज! मुग्धा-प्रथमेशनंतर आणखी एक लिटिल चॅम्प करणार लग्न

Last Updated:
प्रथमेश आणि मुग्धा यांच्यानंतर आणखी एक लिटिल चॅम्प लग्न करणार आहे. तिने नुकतेच तिचे टान्झानियाच्या जंगलातील फिल्मी स्टाइल प्रपोजलचे फोटो शेअर केलेत.
advertisement
1/9
मुग्धा-प्रथमेशनंतर आणखी एक लिटिल चॅम्प करणार लग्न, टान्झानियाच्या जंगलात केलं प्रपोज, PHOTO
सा रे ग म प चे लिटिल चॅम्प आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातील अनेक आज मराठी तसंच हिंदी इंडस्ट्रीत नामांकित गायक म्हणून काम करत आहेत.
advertisement
2/9
अनेकांनी लग्न केलं. रोहित राऊत-जुईली जोगळेकर यांनी लग्न केलं. मुग्धा आणि प्रथमेश यांची जोडी तर हिट झाली. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली.
advertisement
3/9
पण आता मुग्धा आणि प्रथमेशनंतर आणखी एक लिटिल चॅम्प लग्नबंधनात अडकणार आहे. तिने नुकतंच तिच्या रिलेशनची माहिती दिली आहे.
advertisement
4/9
या लिटिल चॅम्पला तिच्या होणाऱ्या नवऱ्याने जंगल सफारीसाठी थेट टान्झानियामध्ये नेलं. जंगल सफारी सुरू असताना अचानक तिला भर जंगलात फिल्मी स्टाइल प्रपोज केलं.
advertisement
5/9
गायिकेनं तिच्या या खास क्षणाचे फोटो शेअर केलेत. तिच्या चाहत्यांना हा भन्नाट अंदाज आवडला असून सगळ्यांनी तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
advertisement
6/9
आपण बोलत आहोत ती गायिका म्हणजेच शरयू दाते. शरयूने तिच्या टान्झानियाच्या जंगलातील फिल्मी स्टाइल प्रपोजलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
advertisement
7/9
प्लॉट ट्विस्ट वाईल्डेस्ट गोष्ट म्हणजे हे प्रपोजल. जंगल सफारी करत असताना अचानक दिलेलं प्रपोजल पाहून शरयू देखील शॉक झाली होती. तिचे रिअँक्शन कॅमेरात कैद झालेत.
advertisement
8/9
विभास वाटवे असं शरयूच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. तो काय करतो हे अद्याप समोर आलेलं नाही. पण त्याच्या सोशल मीडियावर Mr. Worldwide lite असं त्याने बायो मध्ये लिहिलं आहे.
advertisement
9/9
गायिका शरयू दाते सारेगम लिटिल चॅम्पमधून पुढे आली. तिच्या गोड आवाजानं तिनं सगळ्यांची मनं जिंकली. रंग माळीयेला हे तिनं गाणं खूप लोकप्रिय झालं. तिनं अनेक सिनेमांसाठी आणि मालिकांसाठी गाणी गायली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्राणी दाखवायला टान्झानियाला नेलं अन् जंगलात केलं प्रपोज! मुग्धा-प्रथमेशनंतर आणखी एक लिटिल चॅम्प करणार लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल