TRENDING:

Bhiwandi Fire: एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! भिवंडीत फर्निचर मार्केटला आग, १० दुकाने जळून खाक, पाहा PHOTOs

Last Updated:
Bhiwandi Fire: भिवंडी-ठाणे रस्त्यावरील कशेळी खाडी लगत असलेल्या चामुंडा कंपाऊंडमधील प्रसिद्ध फर्निचर मार्केटला आज भीषण आग लागली.
advertisement
1/7
 होत्याचं नव्हतं झालं! भिवंडीत फर्निचर मार्केटला आग, १० दुकाने जळून खाक, पाहा PHOTOs
भिवंडी-ठाणे रस्त्यावरील कशेळी खाडी लगत असलेल्या चामुंडा कंपाऊंडमधील प्रसिद्ध फर्निचर मार्केटला आज भीषण आग लागली. या आगीत तयार फर्निचरची सुमारे ८ ते १० दुकाने जळून खाक झाली.
advertisement
2/7
या आगीत व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.
advertisement
3/7
आगीची माहिती मिळताच भिवंडी महापालिकेच्या २ आणि ठाणे महापालिकेच्या १ अशा एकूण ३ अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
advertisement
4/7
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. मात्र, आग लागल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
5/7
आगीचा भडका उडाल्याचे लक्षात येताच अनेक दुकानदारांनी आपले तयार फर्निचर दुकानाबाहेर काढून रस्त्यावर ठेवण्यास सुरुवात केली. आपले नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांची मोठी पळापळ सुरू होती.
advertisement
6/7
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र या आगीत मोठ्या प्रमाणावर तयार फर्निचर जळून राख झाले आहे.
advertisement
7/7
सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून कूलिंगचे काम सुरू आहे. जीवितहानी टळल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असला तरी, या आगीने फर्निचर मार्केटमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
Bhiwandi Fire: एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! भिवंडीत फर्निचर मार्केटला आग, १० दुकाने जळून खाक, पाहा PHOTOs
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल