TRENDING:

मुंबईकर सावधान! अरबी समुद्र खवळणार, सर्वाधिक उंचीच्या लाटा येणार, 24 दिवस महत्त्वाचे!

Last Updated:
Mumbai weather Alert: प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीच्या काळात समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे.
advertisement
1/7
मुंबईकर सावधान! अरबी समुद्र खवळणार, सर्वाधिक उंचीच्या लाटा येणार, 24 दिवस महत्त्वाचे!
सध्या मोठे बदल दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले होते, तर आता मार्च महिन्यातच राज्यातील काही भागात पावसाच्या सरी आणि गारपीटही पाहायला मिळत आहे. या बदलत्या वातावरणात पावसाळ्याला अवघे तीन महिने शिल्लक असताना, मुंबईसमोर पुन्हा एकदा पाणी साचण्याचा धोका उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
advertisement
2/7
मुंबई महापालिकेकडून पावसाळ्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, जून ते सप्टेंबर या काळात तब्बल 24 दिवस समुद्राला भरती येणार आहे. विशेष म्हणजे जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्वाधिक उंच भरती येणार असून, काही दिवशी समुद्राच्या लाटा 4.8 मीटरपेक्षा जास्त उंचीपर्यंत उसळण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/7
जून महिन्यात 16 आणि 17 तारखेला दुपारच्या सुमारास सुमारे 4.87 मीटरपर्यंत लाटा उसळणार आहेत. त्यानंतर जुलै महिन्यात 15 आणि 16 जुलैला मोठी भरती अपेक्षित असून, 16 जुलै रोजी सुमारे 4.89 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
ऑगस्टमध्येही 14 ऑगस्टसह पाच दिवस मोठी भरती राहणार आहे, तर सप्टेंबरमध्ये 11 तारखेसह सात दिवस भरतीचा प्रभाव अधिक जाणवणार आहे.
advertisement
5/7
भरतीच्या काळात समुद्रातील पाणी बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो. या वेळी पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी वापरण्यात येणारे पंपिंग स्टेशनचे दरवाजे आणि सांडपाण्याचे गेट्स बंद ठेवावे लागतात. त्यामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण होते.
advertisement
6/7
दरवर्षीप्रमाणे यंदाही जोरदार पाऊस आणि भरती एकाच वेळी आल्यास मुंबईत पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
7/7
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीच्या काळात समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे, तसेच बाहेर पडण्यापूर्वी भरती-ओहोटीच्या वेळा आणि हवामानाचा अंदाज तपासावा, असेही सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मुंबईकर सावधान! अरबी समुद्र खवळणार, सर्वाधिक उंचीच्या लाटा येणार, 24 दिवस महत्त्वाचे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल