Weather Alert: गुढीपाडव्याला महाराष्ट्रात वादळाची एंट्री, सर्वदूर पाऊस कोसळणार, 31 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
महाराष्ट्राला 19 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी हवामान खात्याने वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अलर्ट दिला आहे. यामध्ये 7 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विभागानुसार हवामान कसं असेल पाहूयात.
advertisement
1/7

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि लातूरमध्ये झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राला 19 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी हवामान खात्याने वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अलर्ट दिला आहे. यामध्ये 7 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विभागानुसार हवामान कसं असेल पाहूयात.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर रत्नागिरीला पावसाचा यलो अलर्ट असेल. मुंबईत कमाल तापमान 32-36 अंश सेल्सियस तर किमान तापमान 24-27 अंश राहील.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात कमाल तापमान 33-36 अंश तर किमान 18-21 अंश राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरला हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. तर धुळे आणि नंदुरबारला पावसाचा यलो अलर्ट असेल.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणीलाही पावसाचा ऑरेंज अलर्ट असेल. ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. हिंगोली, लातूर आणि धाराशिवला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी.
advertisement
6/7
विदर्भ नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीला पावसाचा यलो अलर्ट असेल. ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल.
advertisement
7/7
एकंदरीत, 19 मार्चला महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीला आलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: गुढीपाडव्याला महाराष्ट्रात वादळाची एंट्री, सर्वदूर पाऊस कोसळणार, 31 जिल्ह्यांना अलर्ट