आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी हिंदू समाजाने केली आहे. पोलीस निरीक्षकांना निवेदन देत कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देखील कसल हिंदू समाजाने दिला आहे.
प्रकरण काय?
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका तरुणाविरुद्ध गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीने पीडित मुलीला मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
advertisement
त्याची माहिती पीडित मुलीने आपल्या वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. आरोपीच्या विरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून आज न्यायालयात हजर केले आहे. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सकल हिंदू संघटनांचा आक्रमक पवित्रा
या प्रकरणानंतर सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून आज शेकडो हिंदू समाज बांधवांनी पोलीस स्टेशन रामनगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांची भेट घेत या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा विश्व हिंदू परिषद तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला.
