TRENDING:

Success Story : 30 हजार खर्च अन् दीड लाख नफा, तरुण शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, असं काय केलं?

Last Updated:
नंदकिशोर सुर्वेला शेतीची आवड असल्यामुळे शिक्षण घेत असतानाच त्याने अर्ध्या एकरात भोपळ्याची लागवड केली आहे. त्याला अवघ्या 90 दिवसांत दीड लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
advertisement
1/7
30 हजार खर्च अन् दीड लाख नफा, तरुण शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, असं काय केलं?
आजकाल तरुण शिक्षण घेत असताना शेतीकडे वळत आहेत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब गावातील अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या नंदकिशोर सुर्वे या तरुणाने केला आहे.
advertisement
2/7
नंदकिशोर सुर्वेला शेतीची आवड असल्यामुळे शिक्षण घेत असतानाच त्याने अर्ध्या एकरात भोपळ्याची लागवड केली आहे. त्याला अवघ्या 90 दिवसांत दीड लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
advertisement
3/7
नंदकिशोर सुर्वे सध्या अकरावीचे शिक्षण घेत आहे. त्याला शेतीबद्दल आवड असल्यामुळे त्याने अर्ध्या एकर क्षेत्रात वरुण कंपनीच्या भोपळ्याची लागवड केली.
advertisement
4/7
यासाठी सुरुवातीला जमिनीची योग्य मशागत करून भुसभुशीत करण्यात आली. त्यानंतर जमिनीत शेणखत टाकून बेड तयार करण्यात आले. याच शेतात यापूर्वी त्याने टोमॅटोचे पीक घेतले होते. त्या बेडवर दुसरे पीक म्हणून भोपळ्याची लागवड करण्यात आली.
advertisement
5/7
या पिकावर भुरी, केवडा आणि फळकुज यांसारखे रोग होऊ नयेत म्हणून वेळोवेळी फवारणी करण्यात आली. यासाठी त्याला 30 हजार रुपयांचा खर्च आला. योग्य नियोजन, मेहनत आणि काळजीपूर्वक व्यवस्थापनामुळे अवघ्या 90 दिवसांत खर्च वजा करून त्याला सुमारे दीड लाख रुपयांचा नफा मिळवला.
advertisement
6/7
नंदकिशोर सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत कॉलेजला जातो. त्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये तो शेतीची कामे करतो. त्याने पिकवलेला भोपळा सोलापूर बाजारात न विकता पुणे येथील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो. सध्या भोपळ्याला 15 ते 30 रुपये किलो दर मिळत असून इतर वेळी 8 ते 10 रुपये दर मिळतो.
advertisement
7/7
तरुण शेतकरी नंदकिशोर सुर्वे सांगतो की, नोकरीच्या मागे धावण्याऐवजी शिक्षण घेत असतानाच शेती किंवा व्यवसायाकडे तरुणांनी वळले तर नोकरीपेक्षाही अधिक उत्पन्न मिळवता येऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : 30 हजार खर्च अन् दीड लाख नफा, तरुण शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, असं काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल