यामुळे मुंबईतील प्रवाशांना आता उबर ॲप न सोडता मेट्रोचे तिकीट खरेदी करता येईल. तिकीट खरेदी करणे सोपे होईल आणि लांब रांगा टाळता येणार आहे. उबर, मुंबई मेट्रो वन आणि ONDC Network यांच्या भागीदारीमुळे हे शक्य झाले आहे. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट शेअर करत दिली आहे. Yatri, Ixigo, Navi, EMT, Tummoc, Tripozo, One Ticket, Autope, Magicpin, Chalo, RedBus, Highway Delite आणि Pelocal यांसारखे अनेक ॲपच्या माध्यमातून ONDC नेटवर्कच्या माध्यमातून मेट्रो तिकीट सेवा आधीपासूनच उपलब्ध आहे.
advertisement
याशिवाय, मुंबई वन ॲप, मुंबई वन कार्ड आणि व्हॉट्स ॲप आधारित तिकिट खरेदी करून तुम्ही मेट्रो सेवांचा लाभ घेऊ शकतात. ही नवीन सुविधा सुरुवातीला प्रमुख उपनगरीय मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो लाईन 2 A आणि 7 वर उपलब्ध होत आहे. त्यानंतर लवकरच 2 B आणि 9 सोबत इतर मार्गांवरही ही सुविधा विस्तारित केली जाईल. मेट्रो तिकिट, रेल्वे तिकिट आणि कॅब बुकिंग या ॲपच्या माध्यमातून तुम्ही असे वेगवेगळे तिकिट तुम्ही बुक करू शकतात. यामुळे प्रवाशांना एकच ॲपवर सर्व बुकिंग करणं शक्य आहे.
