TRENDING:

Maharashtra Kesari 2026 : गादी आखाड्यातून पुण्याच्या वैभव तांगडेची बाजी, छत्रपती संभाजी नगरच्या अखिलेश पवारला केलं चितपट

Last Updated:

महाराष्ट्राच्या मातीतील अस्मितेचा खेळ असलेल्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज स्व.अजितदादा क्रीडानगरीत पार पडला.उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Maharashtra Kesari 2026 : वाघोली येथे पार पडलेल्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात गादी आखाड्यातून पुण्याचा वैभव तांगडे यांनी छत्रपती संभाजी नगरच्या अखिलेश पवारला आस्मान दाखवलं आहे.त्यामुळे या स्पर्धेत
Maharashtra Kesari 2026
Maharashtra Kesari 2026
advertisement

पुण्याचा वैभव तांगडे विजयी ठरला असून छत्रपती संभाजी नगरच्या अखिलेश पवारचा पराभव झाला आहे.

महाराष्ट्राच्या मातीतील अस्मितेचा खेळ असलेल्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज स्व.अजितदादा क्रीडानगरीत पार पडला.उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या.

advertisement

दरम्यान कार्यक्रमातउद्धाटन प्रसंगी बोलताना सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेचा गौरव केला. खेळाडूंनी प्रामाणिकपणे खेळ सादर करून राज्याचा झेंडा जागतिक स्तरावर उंचावावा,असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेचे भव्य आयोजन केल्याबद्दलआयोजक रामकृष्ण सातव पाटील यांचेही त्यांनी कौतुक केले.

आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी यंदाच्या स्पर्धेत महिलांचा लक्षणीय सहभाग असल्याचे सांगितले. सुमारे चार हजार महिलांनी सहभाग नोंदवला असून, कुस्तीविषयीचा दृष्टिकोन बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे पाटील म्हणाले.या स्पर्धेची परंपरा स्वर्गीय कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी सुरू केली होती. त्यांचा वारसा पुढे नेत यंदाची स्पर्धा "स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी" येथे आयोजित करण्यात आली आहे.

advertisement

स्पर्धेत बक्षीस काय मिळणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला फॉर्च्युनर गाडी,उपविजेत्याला स्कॉर्पिओ, सुवर्णपदक विजेत्यांना 18 बुलेट आणि रौप्यपदक विजेत्यांना स्प्लेंडर गाड्या देण्यात येणार आहेत. दरम्यान ही स्पर्धा 18 ते 22 मार्चदरम्यान रंगणार असून या स्पर्धेकडे राज्यभरातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Maharashtra Kesari 2026 : गादी आखाड्यातून पुण्याच्या वैभव तांगडेची बाजी, छत्रपती संभाजी नगरच्या अखिलेश पवारला केलं चितपट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल