AudiSQ8: नुसता धुरळा! 100 किमी वेग फक्त 4 सेकंदात; सुपर SUV चा लूक पाहून पडाल प्रेमात
- Published by:Sachin S
Last Updated:
जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर SUV च्या किंमती आता बजेटमध्ये आल्या आहेत. हेच हेरून जर्मन कार उत्पादक कंपनी ऑडीने भारतात आता आणखी दमदार आणि पॉवरफुल अशी SUV लाँच केली आहे.
advertisement
1/9

भारतात सध्या SUV सेगमेंटमध्ये चांगलीच स्पर्धा वाढली आहे. जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर SUV च्या किंमती आता बजेटमध्ये आल्या आहेत. हेच हेरून जर्मन कार उत्पादक कंपनी ऑडीने भारतात आता आणखी दमदार आणि पॉवरफुल अशी SUV लाँच केली आहे. Audi SQ8 असं SUV चं नाव आहे. Audi SQ8 ही Audi Q8 च्या लाईनअपमध्ये स्थान मिळवणारी आहे. ही एसयूव्ही इतकी पॉवर फुल आहे की, अवघे ०-१०० किमी वेग फक्त ४ सेंकदात गाठते.
advertisement
2/9
Audi SQ8 मध्ये ४.०-लिटर ट्वीन टर्बो इंजिन दिलं आहे, जे ५०७ बीएपी पॉवर आणि ७७० एनएम टॉर्क जनरेट करतो. त्यामुळे ही एसयूव्ही फक्त ४.१ सेकंदांत ० ते १०० किमी/तास वेग गाठते. या Audi SQ8 चा टॉप स्पीड २५० किमी प्रतितास इतका आहे.
advertisement
3/9
Audi SQ8 मध्ये क्वॉट्रो परमनंट ऑल-व्हील ड्राइव्हसह सेल्फ-लॉकिंग सेंटर डिफरेंशियल, अॅडप्टिव्ह एअर सस्पेन्शन स्पोर्ट आणि कंटिन्युअस अॅडप्टिव्ह डॅम्पिंग सिस्टीम यामुळे चांगलं नियंत्रण मिळता येतं. Audi SQ8 मध्ये स्पोर्ट एक्झॉस्ट सिस्टीम आणि साउंड प्रोफाइल दिली आहे.
advertisement
4/9
Audi SQ8 च्या इंटिरियरबद्दल बोलायचं झालं तर आतमध्ये एचडी मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्ससह ऑडी लेझर लाइट दिले आहे. २२-इंचांचे अलॉय व्हील्स, पर्यायी सिरॅमिक ब्रेक्स, एस-विशिष्ट बंपर्स, डोअर सिल ट्रिम्स आणि लाल रंगातील ब्रेक कॅलिपर्स दिले आहे. तसंच, फ्रेमलेस डोअर्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ दिला आहे. कार्बन स्टाइल आणि ब्लॅक स्टाइलिंगमध्येही Audi SQ8 उपलब्ध आहे.
advertisement
5/9
Audi SQ8 च्या इंटीरिअर आणि इन्फोटेनमेंटमध्ये पुढील बाजूला एस एम्बॉसिंग असलेल्या स्पोर्ट सीट्स आणि मायक्रोफायबर/लेदर कॉम्बिनेशन अपहोल्स्ट्री दिले आहे, तर पर्यायी व्हॅलकोना लेदर सीट्समध्ये हीटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज फंक्शन दिला आहे. तसंच १७ स्पीकर्स, ७३०-वॅट आउटपुट आणि १६-चॅनेल अॅम्प्लिफायरसह बँग अँड ऑलुफसेन थ्रीडी प्रीमियम साउंड सिस्टम दिले आहे.
advertisement
6/9
सुरक्षेसाठी Audi SQ8 मध्ये ८ एअरबॅग्स, स्पीड लिमिटरसह क्रूझ कंट्रोल आणि ऑडी प्री सेन्स बेसिक यांचा समावेश आहे. ३६०-डिग्री कॅमेऱ्यांसह पार्क असिस्ट प्लस, सॉफ्ट डोअर क्लोज, इलेक्ट्रिक लगेज कंपार्टमेंट लिड आणि वायरलेस चार्जिंगसह ऑडी फोन बॉक्स लाइट सारखे पिचर्स दिले आहे.
advertisement
7/9
Audi SQ8 ही मिथोस ब्लॅक, डेटोना ग्रे, ग्लेशियर व्हाइट, अस्कारी ब्लू, चिली रेड, सखीर गोल्ड, सॅटेलाइट सिल्व्हर आणि वॅटोमो ब्लू रंगात उपलब्ध आहे. तसंच, ऑडी एक्सक्लूसिव्ह कस्टम रंगही पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.
advertisement
8/9
“Audi SQ8 ही एक पॉवरफुल अशी एसयूव्ही आहे. दैनदिन प्रवास, आरामदायी ड्रायव्हिंग आणि वीकेण्‍डला लाँग ड्राईव्हसाठी प्लॅनिंग करणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून Audi SQ8 ही डिझाइन केली आहे. आम्‍हाला भारतभरात तरूण ग्राहकांमध्‍ये परफॉर्मन्‍स कारसाठी वाढती मागणी दिसून येत आहे आणि Audi SQ8 ही भारतातील बाजारपेठेत सर्वोत्तम परफॉर्मन्‍स देणारी एसयूव्ही ठरणारी आहे, असं ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्‍टर बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले.
advertisement
9/9
Audi SQ8 ची भारतात सुरुवाती किंमत १.७८ कोटी रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. Audi Q8 ची किंमत 1.13 कोटी इतकी आहे. RSQ8 ची किंमत 2.34 कोटी इतकी आहे. स्टँडर्ड ट्रीमच्या तुलनेत एसक्यू8 ची किंमत 65 लाख रुपयांनी जास्त आणि परफॉर्मेंस ट्रिमच्या तुलनेत 56 लाख रुपयांनी कमी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
AudiSQ8: नुसता धुरळा! 100 किमी वेग फक्त 4 सेकंदात; सुपर SUV चा लूक पाहून पडाल प्रेमात