TRENDING:

IT कंपनीतल्या पगारालाही मागे टाकलं! 7 दिवसांतील Zepto रायडरच्या कमाईचा आकडा धक्कादायक; स्क्रीनशॉट व्हायरल

Last Updated:

ऐकायला कदाचित हे एखाद्या मोठ्या इंजिनिअरचं पॅकेज वाटेल, पण ही एका साध्या डिलिव्हरी रायडरची मेहनत आहे. नक्की काय आहे हे प्रकरण आणि 'गिग इकॉनमी' (Gig Economy) तरुणांसाठी सोन्याची खाण ठरतेय का? चला सविस्तर जाणून घेऊया.

advertisement
मुंबई : आजच्या काळात आपण घराबाहेर न पडता फक्त मोबाईलवर एक क्लिक केलं की 10 मिनिटांत दूध, भाजी किंवा किराणा दारात हजर होतो. हे सगळं पॉसिबल आहे ते डिलिव्हरी रायडर्समुळे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता रस्त्यावरून धावणाऱ्या या तरुणांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण, सध्या सोशल मीडियावर एका डिलिव्हरी बॉयच्या कमाईचा असा काही स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे, ज्याने मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांनाही विचार करायला भाग पाडलं आहे.
झेप्टो डिलिव्हरी रायडर
झेप्टो डिलिव्हरी रायडर
advertisement

एका आठवड्यात 17 हजार रुपये. ऐकायला कदाचित हे एखाद्या मोठ्या इंजिनिअरचं पॅकेज वाटेल, पण ही एका साध्या डिलिव्हरी रायडरची मेहनत आहे. नक्की काय आहे हे प्रकरण आणि 'गिग इकॉनमी' (Gig Economy) तरुणांसाठी सोन्याची खाण ठरतेय का? चला सविस्तर जाणून घेऊया.

बेंगळुरूच्या रायडरचा 'तो' व्हायरल स्क्रीनशॉट

सोशल मीडियावर सध्या एका झेप्टो (Zepto) रायडरची चर्चा रंगली आहे. बेंगळुरूमध्ये काम करणाऱ्या या तरुणाने आपल्या 7 दिवसांच्या कमाईचा पुरावाच सादर केला. स्क्रीनशॉटनुसार, त्याने अवघ्या एका आठवड्यात 17,109 रुपये कमावले आहेत. म्हणजेच दिवसाला सरासरी 2,400 रुपयांहून अधिक कमाई. एवढंच नाही, तर त्याने मागील काही आठवड्यांचाही हिशोब दाखवला, ज्यात त्याने 12,000 ते 15,000 रुपयांपर्यंत मजल मारली होती. हा आकडा पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

advertisement

'क्विक कॉमर्स'च्या वाढत्या मागणीमुळे Zepto, Swiggy Instamart आणि Zomato Blinkit सारख्या प्लॅटफॉर्म्सनी तरुणांसाठी रोजगाराचे नवीन दरवाजे उघडले आहेत. मेहनतीची तयारी असेल आणि ऑर्डरचा ओघ सतत सुरू राहिला, तर आठवड्याला 15 ते 20 हजार रुपये कमावणे आता अशक्य राहिलेले नाही. अनेक विद्यार्थी आणि पार्ट-टाइम काम शोधणाऱ्यांसाठी हा एक उत्तम आर्थिक स्रोत ठरत आहे.

advertisement

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस पडला. काही युजर्स गमतीने म्हणतायत, "भावा, एवढे पैसे तर मला ऑफिसमध्ये बसूनही मिळत नाहीत," तर कोणी म्हणतंय, "हे तर टॉप इंजिनिअरिंग पॅकेजला टक्कर देणारं काम आहे!" या व्हायरल पोस्टमुळे डिलिव्हरी जॉबकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलताना दिसतोय. अनेक तरुणांनी आता या क्षेत्राकडे करिअरचा एक गांभीर्याने विचार करण्याजोगा पर्याय म्हणून पाहायला सुरुवात केली आहे.

advertisement

17 हजारांचा आकडा आकर्षक वाटत असला, तरी त्यामागे अतोनात शारीरिक कष्ट दडलेले आहेत. ही कमाई करण्यासाठी रायडर्सना दिवसातील 10 ते 12 तास रस्त्यावर घालवावे लागतात. सततची धावपळ, ट्रॅफिक आणि वेळेत पोहोचण्याचे दडपण यामुळे हे काम आव्हानात्मक असते. शिवाय प्रत्येक आठवड्यात इतक्याच ऑर्डर्स मिळतील याची शाश्वती नसते.

गिग इकॉनमीने तरुणांना वेळेचं बंधन न ठेवता पैसे कमवण्याची संधी दिली आहे. झेप्टो रायडरची ही कथा सांगते की, जर तुमच्याकडे जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर यश कोणत्याही क्षेत्रात मिळू शकतं. पण ही 'बंपर' कमाई केवळ स्क्रीनशॉटपुरती मर्यादित नसून त्यामागे रक्ताचं पाणी करणारी मेहनत आहे, हे विसरून चालणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
IT कंपनीतल्या पगारालाही मागे टाकलं! 7 दिवसांतील Zepto रायडरच्या कमाईचा आकडा धक्कादायक; स्क्रीनशॉट व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल