इलेक्ट्रिक कार चार्ज करताना आग, इंदुरमध्ये 7 जण दगावले; वाहन चार्ज करताना करू नका 'या' चुका
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Electric Car Charging Points: इंदुरमध्ये मोठी घटना घडली. इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना शॉर्ट सर्टिक होऊन भीषण आग लागली. यात 7 जणांचा मृत्यू झाला. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करताना कोणत्या चुका करू नयेत पाहूया...
advertisement
1/7

नवी दिल्ली : तुम्हीही इलेक्ट्रिक वाहन घरीच चार्ज करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण इंदुरमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना झालेल्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला आहे. असा अपघात होऊ नये म्हणून इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना कोणत्या चुका करू नयेत याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
2/7
ओव्हरलोडेड सॉकेट : इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करताना लक्षात घ्या की, ओव्हरलोडेड सॉकेटमध्ये चार्ज करणे योग्य नसते. गाडीच्या चार्जिंगसाठी वेगळ्या सॉकेटचा वापर करायला हवा. कारण एकाच बोर्डमध्ये अनेक चार्जर लावणे योग्य नाही.
advertisement
3/7
मजबूत चार्जिंग केबल : चार्जिंग दरम्यान चांगल्या ब्रांडेंड चार्जिंग केबलचा वापर करावा. कारण स्वस्त किंवा लोकल चार्जिंग केबल अनेकदा फॉल्टिंग करतात. तर हे अनेकदा ओव्हरहीट होऊन आगही पकडू शकते. यामुळे कंपनीकडून जी केबल मिळते. तिचा वापर करणे योग्य ठरते.
advertisement
4/7
ओली जागा : अनेकदा आपण पाणी किंवा उघड्या स्थानावर चार्जिंग सुरू करतो. मात्र हे हानीकारक ठरू शकते. कारण ओलावा किंवा ओली जाग्यावर शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो. अशावेळी ओल्या किंवा ओपन स्थानावर चार्जिंग करण्यापासून नेहमी बचाव करावा. हवेशीर आणि कोरढ्या स्थानावर चार्जिंग करायला हवी.
advertisement
5/7
बॅटरी फूल करणे : अनेकदा लोक बॅटरी पूर्णपणे चार्ज करतात. पण 100 टक्के बॅटरी चार्ज केल्याने बॅटरीची लाइफ कमी होते. या व्यतिरिक्त 20-80 नियमात चार्जिंग करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे चार्जिंग 20 च्या खाली जाऊ देऊ नका आणि 80 च्या वर जाऊ देऊ नका.
advertisement
6/7
चार्जिंग लावून सोडून देणे : अनेकदा लोक ही मोठी चूक करता. बॅटरी चार्जला लावून ती सोडून देतात. वाहन चार्जिंगला लावलेले असताना त्यावर नजर ठेवणे गरजेचे असते. रात्री चार्जिंगला लावून झोपी गेल्याने अनर्थ घडू शकतो. यामुळे चार्जिंगला वाहन लावले असेल तर वेळोवेळी चेक करत राहा.
advertisement
7/7
सावधगिरी बाळगणे गरजेचे : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग दरम्यान सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. कारण तुम्ही दुर्लक्ष केले तर हे हानिकारक ठरू शकते. योग्य वायरिंग, सुरक्षित जागा आणि सावधगिरी बाळगणे कधीही चांगले. अन्यथा ते आपल्या जीवावर बेतू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
इलेक्ट्रिक कार चार्ज करताना आग, इंदुरमध्ये 7 जण दगावले; वाहन चार्ज करताना करू नका 'या' चुका