TRENDING:

सावधान! 'या' मूलांकांच्या लोकांचा हर्ट करू नका 'ईगो', तुमची एक चूक करेल ट्रिगर; शेवटपर्यंत निभावतात दुश्मनी

Last Updated:

अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला होतो, त्यावरून तिचा 'मूलांक' ठरतो. हा मूलांक केवळ स्वभावच नाही, तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत आणि प्रतिक्रिया देण्याची शैली देखील दर्शवतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Numerology : अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला होतो, त्यावरून तिचा 'मूलांक' ठरतो. हा मूलांक केवळ स्वभावच नाही, तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत आणि प्रतिक्रिया देण्याची शैली देखील दर्शवतो. काही मूलांकांच्या व्यक्ती अत्यंत प्रेमळ असतात, तर काही व्यक्ती अशा असतात ज्यांचा 'ईगो' चुकूनही दुखावला तर त्या ते कधीही विसरत नाहीत.
News18
News18
advertisement

मूलांक 1: जन्म तारीख: 1, 10, 19, 28

मूलांक 1 चा स्वामी 'सूर्य' आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे, तसेच या मूलांकाचे लोक स्वतःला कोणापेक्षा कमी मानत नाहीत. जर तुम्ही त्यांच्या कामात विनाकारण ढवळाढवळ केली किंवा त्यांच्या अधिकाराला आव्हान दिले, तर त्यांचा अहंकार दुखावला जातो. हे लोक सहजासहजी कोणाचे वाईट करत नाहीत, पण एकदा का त्यांचा अपमान झाला की, ते समोरच्या व्यक्तीशी असलेले सर्व संबंध कायमचे तोडून टाकतात आणि तिला आपल्या आयुष्यातून बाद करतात.

advertisement

मूलांक 3: जन्म तारीख: 3, 12, 21, 30

मूलांक 3 चा स्वामी 'गुरु' आहे. हे लोक ज्ञान आणि शिस्तीचे भोक्ते असतात. जेव्हा कोणी त्यांच्या ज्ञानावर शंका घेते किंवा भरचौकात त्यांचा अनादर करते, तेव्हा त्यांना प्रचंड राग येतो. त्यांना 'उपदेश' देणे किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवणे अजिबात आवडत नाही. हे लोक सहसा शांत असतात, पण त्यांचा अपमान झाला तर ते समोरच्या व्यक्तीला शब्दांच्या माध्यमातून किंवा आपल्या प्रगतीच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर देतात. ते आपला अपमान कधीही विसरत नाहीत.

advertisement

मूलांक 5: जन्म तारीख: 5, 14, 23

मूलांक 5 चा स्वामी 'बुध' आहे. हे लोक अत्यंत बुद्धिमान आणि चपळ असतात. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य खूप प्रिय असते. जर कोणी त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपहास केला, तर ते अत्यंत आक्रमक होतात. त्यांना 'मूर्ख' ठरवणे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे ट्रिगर असते. हे लोक खूप धूर्तपणे आपला बदला घेतात. ते समोरच्या व्यक्तीची कमजोरी ओळखून त्यावर वार करण्यात पटाईत असतात.

advertisement

मूलांक 8: जन्म तारीख: 8, 17, 26

मूलांक 8 चा स्वामी 'शनी' आहे. अंकशास्त्रात हा सर्वात गंभीर आणि रहस्यमयी मूलांक मानला जातो. हे लोक कष्टाळू असतात आणि त्यांना खोटेपणा अजिबात आवडत नाही. जर कोणी त्यांना फसवले किंवा त्यांच्या कष्टाचा अनादर केला, तर त्यांचा राग अनावर होतो. मूलांक 8 चे लोक सर्वात धोकादायक शत्रू ठरू शकतात. ते 'शांत' राहून आपला बदला घेण्याची योजना आखतात. ते कित्येक वर्षे आपला अपमान लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावरच समोरच्या व्यक्तीला तिची जागा दाखवून देतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’, 4 वर्षांपासून नरेंद्र करतात अनोखी सेवा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
सावधान! 'या' मूलांकांच्या लोकांचा हर्ट करू नका 'ईगो', तुमची एक चूक करेल ट्रिगर; शेवटपर्यंत निभावतात दुश्मनी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल