advertisement

दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’, 4 वर्षांपासून नरेंद्र करतात अनोखी सेवा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

Last Updated:

विशेषतः बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्या लोकांना योग्य प्लॅटफॉर्म आणि ट्रेन शोधण्यात अडचणी येतात. हीच समस्या ओळखून नरेंद्र पाटील यांनी स्वतःहून पुढाकार घेतला.

+
दादर

दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’ – नरेंद्र पाटील यांची अनोखी सेवा

मुंबई : मुंबईच्या दादर स्थानकावर दररोज सकाळी एक अनोखी सेवा पाहायला मिळते. वरळी गावातील नरेंद्र पाटील हे गेल्या चार वर्षांपासून दररोज सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेत प्रवाशांना योग्य ट्रेनची माहिती देण्याचे काम करत आहेत. स्थानकावरील ब्रिजवर स्पष्ट इंडिकेटर नसल्यामुळे अनेक प्रवाशांचा गोंधळ होतो. विशेषतः बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्या लोकांना योग्य प्लॅटफॉर्म आणि ट्रेन शोधण्यात अडचणी येतात. हीच समस्या ओळखून नरेंद्र पाटील यांनी स्वतःहून पुढाकार घेतला.
नरेंद्र पाटील सांगतात की, मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा, हा माझा उद्देश आहे. इंडिकेटर नसल्यामुळे लोकांची गैरसोय होते, म्हणून मी ही सेवा सुरू केली. ते रोज दोन तास स्थानकावर उभे राहून प्रवाशांना मार्गदर्शन करतात आणि त्यानंतर आपल्या खासगी नोकरीसाठी जातात.
यापूर्वी कोविड महामारीपूर्वी ते सिद्धिविनायक मंदिरातही सेवा देत होते. मात्र, सध्या मंदिरातील गर्दी कमी झाल्याने त्यांनी आपले लक्ष दादर स्थानकाकडे वळवले. येथे ते विनामूल्य सेवा देत असून त्यांच्या या कार्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो.
advertisement
विशेष म्हणजे त्यांनी रेल्वे प्रशासनालाही ब्रिजवर इंडिकेटर बसवण्याची विनंती केली होती. मात्र, अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतः पुढे येत लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
नरेंद्र पाटील यांची ही निस्वार्थ सेवा समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातही वेळ काढून इतरांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’, 4 वर्षांपासून नरेंद्र करतात अनोखी सेवा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement