Nashik Traffic: गुढीपाडव्याला त्र्यंबकेश्वरला जाताय? पोलिसांनी बंद केलेत मुख्य रस्ते; पर्यायी रस्ते कोणते?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
गुढीपाडवा सणानिमित्त नाशिकमध्ये सातपूर परिसरात भवानी माता उत्सव आणि बारागाड्या ओढण्याचा पारंपरिक कार्यक्रम असतो. यामुळे नाशिक वाहतूक पोलिसांनी वाहतूकदारांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.
नाशिक: गुढीपाडव्याच्या सणानिमित्त नाशिकमधील सातपूर परिसरामध्ये भवानी माता उत्सव आणि बारागाड्या ओढण्याचा पारंपरिक कार्यक्रम असतो. त्यामुळे जर तुमचा उद्या त्र्यंबकेश्वरला जाण्याचा प्लॅन असेल, तर एकदा ही बातमी वाचूनच घरातून निघा. त्याप्रमाणेच पर्यायी मार्गांचा वापर करून तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊ शकणार आहेत. गुढीपाडव्यानिमित्त नाशिकच्या सातपूर परिसरात, काही पारंपरिक कार्यक्रमांचे सकाळी नियोजन असते. त्यामुळे नाशिक- त्र्यंबकेश्वर मार्गावर नाशिककरांची मोठी गर्दी असते. त्या काळात वाहन चालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन नाशिक वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केले.
नाशिक- त्र्यंबकेश्वर रोड परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक वाहतूक पोलिसांनी वाहतूकीच्या मार्गांमध्ये बदल केलेला आहे. पोलीस उपायुक्त किरिथिका सी.एम. यांनी याबद्दलची अधिसूचना जारी करत नाशिककरांना महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात गुरूवारी दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेमध्ये, सकाळ सर्कल ते महिंद्रा सर्कल या परिसरात व्हिक्टरी चौक ते सातपूर गाव कमान मार्गे जाणाऱ्या नाशिक- त्र्यंबकेश्वर रोडवरील दोन्हीही बाजूंनी जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. या मार्गासाठी नाशिकच्या वाहतूक पोलिसांनी वाहतूकदारांना पर्यायी मार्ग सुद्धा दिला. या काळात जाणाऱ्या सर्व वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे.
advertisement
नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक सकाळ सर्कल, अचानक चौक, पंढरीनाथ गांगुर्डे मार्ग, महावितरण कार्यालय, नाशिक ऑक्सिजन कंपनी, बॉश कंपनी, महिंद्रा सर्कल आणि पपाया नर्सरी मार्गे वळवली जाणार आहे. या मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू राहिल. भवानी माता उत्सव आणि बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमादरम्यान, नाशिककरांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, या काळामध्ये नाशिक वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहतूकदारांवर पोलीस कारवाई करणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी सांगितले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 3:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Traffic: गुढीपाडव्याला त्र्यंबकेश्वरला जाताय? पोलिसांनी बंद केलेत मुख्य रस्ते; पर्यायी रस्ते कोणते?






