advertisement

Food In Nashik : अस्सल घरगुती चव, 35 रुपयांत पोटभर जेवण, पाहा नाशिकमधलं लोकेशन

Last Updated:
गेल्या 40 वर्षांपासून शरद सराफ यांनी अजय भोजनालय ही जनसेवा सुरू केली आहे. हे भोजनालय रामसेतू पुलाजवळ आहे. यामध्ये ते स्वस्तात जेवण देतात.
1/7
प्रत्येक शहराची एक ओळख असते. महाराष्ट्रातील नाशिक शहर धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी रोज लाखो भाविक येत असतात.

2/7
या येणाऱ्या भाविकांची आणि लोकांची जेवणाची सोय व्हावी म्हणून गेल्या 40 वर्षांपासून शरद सराफ यांनी अजय भोजनालय ही जनसेवा सुरू केली आहे. हे भोजनालय रामसेतू पुलाजवळ आहे. यामध्ये ते स्वस्तात जेवण देतात.

3/7
हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी शरद यांची पंचवटीतील रामसेतू पुलाजवळ एक छोटी चहाची गाडी होती. हा भाग मुख्य असल्याने यांच्याकडे रोज अनेक लोक येत असत. बरेच गोरगरीब नागरिक यांच्याकडे जेवणाची विचारपूस करत होते.

4/7
त्यामुळे शरद यांना भोजनालय सुरू करावे अशी कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी 40 वर्षांपूर्वी फक्त 5 रुपयात अन्न सेवा सुरू केली होती. त्यांच्या अन्न सेवेत मुलगा रवींद्र आणि संपूर्ण कुटुंब त्यांना मदत करत असल्याचे पाहायला मिळते.

5/7
या ठिकाणी श्रीमंत असो अथवा गरीब, या अजय भोजनालय आणि जनसेवा केंद्रातील घरगुती जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय पंचवटीतून निघत नाही. शरद सराफ अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याने यात कोणताही व्यवसाय नको, या विचारामुळे जेवण फक्त 35 रुपयांत देतात.

6/7
तसेच याठिकाणी कुणाकडे पैसे नसले तरी मोफत जेवण दिले जाते. आजही हीच सेवा शरद यांचे चिरंजीव रवींद्र हे पुढे नेत आहेत. आज 35 रुपयात यांच्याकडे सर्व लोक पोटभर जेवण करून जात असतात.

7/7
त्यांच्याकडे तीन भाकरी, रस्सेदार भाजी आणि भात असे जेवण मिळते. तुम्ही देखील नाशिकला आलात तर पंचवटी येथील रामसेतू पुलाजवळील शनि मंदिराच्या बाजूला असलेल्या अजय भोजनालयाला नक्की भेट द्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement