स्मार्टफोनचं Power Button नेहमी उजव्या बाजूलाच का असतं? मोबाईल हातात धरल्यावर कधी 'या' गोष्टीकडे लक्ष दिलंय
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही कधी विचार केलाय का की, जगातील जवळपास सर्वच कंपन्या पावर बटन 'उजव्या' बाजूलाच का देतात? पूर्वी काही फोन्समध्ये हे बटन वरच्या बाजूला किंवा मागे असायचं, मग आता उजव्या बाजूचं 'स्टँडर्ड' कसं बनलं? चला, यामागचं रंजक कारण समजून घेऊया.
दिवसभरात आपण शेकडो वेळा आपला स्मार्टफोन हातात घेतो, स्क्रीन ऑन करतो आणि जगाशी जोडले जातो. मग तो आयफोन असो वा अँड्रॉइड, एक गोष्ट आपण नकळतपणे करतो ती म्हणजे अंगठ्याने 'पावर बटन' दाबणे. आजकालचे स्मार्टफोन दिसायला जेवढे साधे आणि स्लिम दिसतात, त्यांच्या रचनेमागे तेवढाच खोल विचार दडलेला असतो. फोनचा प्रत्येक पोर्ट, प्रत्येक बटन आणि त्याची जागा ही केवळ डिझाइनचा भाग नसून त्यामागे मानवी सवयींचा मोठा अभ्यास आहे.
advertisement
advertisement
1. तुमच्या हाताची ठेवण आणि अंगठ्याची जादूयामागचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपली नैसर्गिक सवय. जगभरातील बहुतांश लोक (सुमारे 90%) उजव्या हाताने काम करणारे आहेत. जेव्हा आपण फोन हातात धरतो, तेव्हा आपला अंगठा नैसर्गिकरित्या फोनच्या उजव्या बाजूला स्थिरावतो. जर पावर बटन तिथेच असेल, तर फोन लॉक किंवा अनलॉक करणे अत्यंत सोपे आणि 'वन-हॅन्ड' युजसाठी सोयीचे ठरते. जर हे बटन वरच्या बाजूला असते, तर आपल्याला दुसरा हात वापरावा लागला असता किंवा बोटं ताणावी लागली असती.
advertisement
2. फिंगरप्रिंट सेन्सर आणि वेगआजकालच्या बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये पावर बटनमध्येच फिंगरप्रिंट सेन्सर दिला जातो. उजव्या बाजूला हे बटन असल्यामुळे फोन खिशातून काढताना किंवा हातात धरताना अंगठा तिथे टेकवताच फोन क्षणार्धात अनलॉक होतो. ही गती आणि सोय वापरकर्त्याचा अनुभव (User Experience) अधिक सुखावह बनवते.
advertisement
3. इंजिनिअरिंग आणि अंतर्गत रचनामोबाईलच्या आतली जागा अत्यंत मर्यादित असते. त्या छोट्याशा जागेत बॅटरी, कॅमेरा मॉड्यूल, मदरबोर्ड, अँटेना आणि अनेक सेन्सर्स बसवायचे असतात. इंजिनिअरिंगच्या दृष्टीने, उजव्या बाजूला बटन बसवणे अधिक सोयीचे असते. कारण डाव्या बाजूला अनेकदा सिम ट्रे किंवा व्हॉल्यूम बटन्सची जागा असते. फोनच्या अंतर्गत भागांची रचना (Internal Layout) विस्कळीत होऊ नये म्हणून उजव्या बाजूचा पर्याय निवडला जातो.
advertisement
advertisement









