Tata Sierra चं मार्केट खाणार ही SUV? किंमतही कमी, पाहा फीचर्स कसे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
कार मार्केटमध्ये विविध कार या एकमेकींना टक्कर देत असतात. सध्या कार मार्केटमध्ये टाटा सिएराची चर्चा जास्त आहे. मात्र आता या कारला टक्कर देणारी कार मार्केटमध्ये आलीये. चला या कारविषयी जाणून घेऊया.
advertisement
advertisement
दोन्ही कारच्या किंमती : या दोन्ही कारच्या किंमती आपण जाणून घेऊया. नवी रेनो डस्टरचा बेस व्हिरिएंट 10.49 लाख रुपये (एक्स शोरुम) मध्ये मिळेल. तर टॉप व्हेरिएंट 18.49 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. टाटा सिएराची सुरुवातीची किंमत ही 11.49 लाखांपासून सुरू होते. तर टॉप व्हेरिएंटची किंमत ही 21.29 लाख रुपये आहे. डस्टर बेस लेव्हलवर 1 लाख रुपयांनी स्वस्त आहे. तर टॉप एंडमध्येही डस्टर जास्त परवडणारी वाटते. चला या कारच्या डिझाइनपासून तर इंजिन आणि मायलेज डिटेल्सविषयी जाणून घेऊया.
advertisement
डिझाइन आणि डिटेल्स : डस्टरचा डिझाइन मॉडर्न आणखी आक्रमक आहे. हे LED हेडलँप्स, मस्कुलर ग्रिल, 212 mm ग्राउंड क्लीयरेंस आणि रग्ड लूकसह सादर करण्यात आले आहे. सिएरा क्लासिक सिएराची आठवण करुन देते. मात्र मॉडर्न टचसह ती लॉन्च करण्यात आली आहे. रुंद बॉडी, हाय स्टायलिंग, लांब व्हीलबेस (डस्टरहून 73 mm जास्त) आणि जास्त रुंद/उंजी याला खास बनवते. सिएरा जास्त प्रीमियम आणि स्पेशियस वाटते.
advertisement
केबिन आणि कम्फर्ट : डस्टरमध्ये ड्युअल स्क्रीन्स (10.1-इंच इन्फोटेनमेंट + 10.25-इंच ड्रायव्हर डिस्प्ले), पॅनोरॅमिक सनरूफ, उत्तम क्वालिटी मटेरियल आणि कनेक्टेड कार फीचर्स आहेत. बूट स्पेस अधिक आहे (518-700 लिटर). सिएरा अधिक लग्जरी फील, (लांब व्हीलबेसमुळे) मागील बाजूस अधिक लेगरूम, प्रीमियम अपहोल्स्ट्री आणि प्रशस्त केबिन देते. दोन्ही गाड्यांमध्ये चांगला स्पेस आहे, परंतु सिएरामध्ये मागील पॅसेंजर्सना जास्त आराम मिळतो.
advertisement
advertisement
इंजिन आणि मायलेज : डस्टर सध्या दोन इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. पहिले 1.0L टर्बो-पेट्रोल (100 PS) आणि दुसरे 1.3L टर्बो (163 PS/280 Nm) इंजिन, यानंतर दिवाळीपर्यंत स्टाँग हायब्रिड व्हेरिएंटही येईल. या कारचं मायलेज 15-20 KMPL च्या आसपास आहे. सिएरा 1.5L NA पेट्रोल (105 PS), 1.5L टर्बो-पेट्रोल (160 PS) आणि 1.5L डिझेल (116 PS) इंजिनसह खरेदी केली जाऊ शकते. या कारचं मायलेज 16-20.5 kmpl पर्यंत आहे.








