केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरात खरचं मुस्लिम नागिरकांना प्रवेश बंदी, असा खरंच नियम आहे का?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
सध्या एक नवीन चर्चा रंगली आहे. सारा अली खान केदारनाथला गेली असता तिला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आल्याचं समोर आलं आहे. पण फक्त सारालाच की मुस्लिम नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे आणि का? हे जाणून घेऊ.
advertisement
1/5

लवकरच चारधाम यात्रेला सुरुवात होणार असून, अनेक भक्त आणि कलाकार मंडळी चारधाम यात्रेत सहभागी होत असल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे फोटोज देखील आहेत.
advertisement
2/5
सध्या एक नवीन चर्चा रंगली आहे. सारा अली खान केदारनाथला गेली असता तिला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आल्याचं समोर आलं आहे. पण फक्त सारालाच की मुस्लिम नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे आणि का? हे जाणून घेऊ.
advertisement
3/5
'श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती'ने (BKTC) मार्च 2026 मध्ये झालेल्या आपल्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार, केदारनाथ आणि बद्रीनाथसह समितीच्या अखत्यारीतील एकूण 47 मंदिरांच्या मुख्य परिसरात 'गैर-हिंदू' किंवा 'गैर-सनातनी' व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
4/5
मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या बिगर-हिंदू व्यक्तींना मंदिरात प्रवेश करायचा आहे, त्यांना आता एक शपथपत्र सादर करावे लागेल. यामध्ये त्यांना "आपली सनातनी धर्मावर आणि संबंधित देवतेवर श्रद्धा आहे" असे लिहून द्यावे लागेल. हा नियम केवळ मुस्लिमांसाठी नसून सर्व बिगर-हिंदू नागरिकांसाठी लागू असेल.
advertisement
5/5
मंदिर समितीच्या मते, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही केवळ प्रेक्षणीय स्थळे किंवा 'टुरिस्ट डेस्टिनेशन' नसून ती सर्वोच्च आध्यात्मिक केंद्रे आहेत. येथील धार्मिक परंपरा आणि पावित्र्य राखण्यासाठी केवळ श्रद्धा असणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जावा, असा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरात खरचं मुस्लिम नागिरकांना प्रवेश बंदी, असा खरंच नियम आहे का?