TRENDING:

पर्यटकांचेही आवडते ठिकाण, अमरावतीत पेढा खावा तर इथंच, अशी चव कुठेच नाही

Last Updated:
पूर्णानागर असं या गावाचं नाव आहे. या गावातील जास्तीत जास्त लोक पेढ्यांचा व्यवसाय करतात. फक्त दूध आणि कमीत कमी साखर वापरून पेढा बनवला जातो. त्यात कोणतेही केमिकल वापरले जात नाही. त्यामुळे येथील पेढा फार प्रसिद्ध झाला आहे.
advertisement
1/5
पर्यटकांचेही आवडते ठिकाण, अमरावतीत पेढा खावा तर इथंच, अशी चव कुठेच नाही
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे आहेत जिथे काही ना काही पदार्थ हा फेमस असतो. त्यामुळे त्या ठिकाणाला एक वेगळी ओळख मिळते. अमरावतीमध्येही असं एक गाव असून पेढ्यांचं गाव म्हणून याला ओळख मिळाली आहे. पूर्णानागर असं या गावाचं नाव आहे. या गावातील जास्तीत जास्त लोक पेढ्यांचा व्यवसाय करतात. फक्त दूध आणि कमीत कमी साखर वापरून पेढा बनवला जातो. त्यात कोणतेही केमिकल वापरले जात नाही. त्यामुळे येथील पेढा फार प्रसिद्ध झाला आहे.
advertisement
2/5
पूर्णानागर मधील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. पण, शेतीत उत्पन्न कमी होत असल्याने शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागत होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि त्याच माध्यमातून हा पेढ्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे.
advertisement
3/5
गावातील शीतल बोबडे यांनी सर्वात अगोदर 25 ते 26 वर्षांपूर्वी पेढ्यांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांचा हा व्यवसाय हिट ठरला. त्यानंतर गावातील अनेक तरुणांनी हा व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले. आता पूर्णानागर बस स्टॉपला पेढ्यांची 15 ते 16 दुकाने आहेत. या पेढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त दूध आणि साखर वापरून हा पेढा बनवला जातो. यामध्ये कोणतेही केमिकल किंवा इतर पदार्थ वापरले जात नाही. साखरेचं प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. 1 लिटर दूध असेल तर 75 ग्रॅम साखर वापरली जाते.
advertisement
4/5
हा पेढा बनवताना मोठ्या कढाईमध्ये 20 लिटर दूध तापवले जाते. त्यानंतर ते 3 तास आटवून घेतले जाते. यामुळे परफेक्ट पेढा बनवायला सोपे जाते. त्यानंतर त्यात साखर टाकली जाते. ती विरघळल्यानंतर मिश्रण थंड करण्यासाठी ठेवले जाते. त्यानंतर तासाभराने पेढा तयार केला जातो.
advertisement
5/5
मेळघाटाला येणाऱ्या पर्यटकांमुळे पेढ्याचा व्यवसाय आणखी वाढीस लागला. पूर्णानागर हे गाव अमरावती परतवाडा रोडवर असल्याने मेळघाटात जाणारे पर्यटक येथे थांबतात आणि पेढ्यांची खरेदी करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
पर्यटकांचेही आवडते ठिकाण, अमरावतीत पेढा खावा तर इथंच, अशी चव कुठेच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल