Sagar Moholkar: 'कर्मा'चा नियम! सागर मोहळकरचा 'गेम' वाजवणारे समोर, 13 दिवसांनी मृत्यूचं कारण उघड
- Published by:Sachin S
Last Updated:
एखाद्या गुन्हेगाराचा शेवट कसा होऊ शकतो, याचं उदाहरण म्हणजे, कधीकाळी पैलवान असलेल्या सागर मोहळकर याचा मृत्यू.
advertisement
1/7

एखाद्या गुन्हेगाराचा शेवट कसा होऊ शकतो, याचं उदाहरण म्हणजे, कधीकाळी पैलवान असलेल्या सागर मोहळकर याचा मृत्यू. अहिल्यानगरमधील जामखेडामध्ये सागर मोहळकर याच्यावर ३ जणांनी गोळीबार केला होता. त्यानंतर पुण्यात सागरने १३ दिवस मृत्यूशी झुंज दिली. पण, शरिरातून ३ गोळ्या बाहेर काढता न आल्यामुळे सागरचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, सागरने पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावली होती. आता पुण्यातच उपचार घेताना सागरचा जीव गेला. एवढंच नाहीतर, त्याच्यावर गोळीबार कऱणारेही पुण्यातचे हल्लेखोर होते.
advertisement
2/7
पैलवान असलेल्या सागरने आधी कुस्तीचं मैदान गाजवलं होतं. पण, गुन्हेगारांची संगत लाागली आणि तोही एक गुन्हेगार झाला. मारामाऱ्या, दमदाटी आणि खून प्रकरणात सागर मोहळकरवर गुन्हे दाखल झाले होते. सागरने धाराशिवमध्ये गावातील जत्रेच्या दरम्यान पुण्याच्या डॉन निलेश घायवळच्या कानाखाली मारली आणि तो प्रकाश झोतात आला.
advertisement
3/7
अशातच ४ मार्च रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास गोळीबार केला. हल्लेखोरांनी सागरच्या चेहऱ्यावरच गोळीबार केला. पण, सागरने जागेरवर जीव सोडला नाही. त्याच्या शरिरात ५ गोळ्या शिरल्याा होत्या. आधी जामखेडमध्ये उपचार घेतले.
advertisement
4/7
त्यानंतर सागरला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मागील १२ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्याच्या शरिरातून २ गोळ्या काढल्या होत्या. पण, ३ गोळ्या या काढणे कठीण झाले होते.
advertisement
5/7
शस्त्रक्रियेदरम्यान सागरची ऑक्सिजन लेव्हल कमी होत होती त्यामुळे शस्त्रक्रिया करता येत नव्हती, अखेरीस १२ व्या दिवशी सागरने जीव सोडला. सागरचा मृत्यू झाला. सागरवर गोळीबार करणाऱ्यांची नाव समोर आली आहे.
advertisement
6/7
सागरवर गोळीबार प्रकरणी जामखेड पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. ९ मार्च रोजी झिक्री गावातून पोलिसांनी अभिमन्यू पोते (वय २४) या तरुणाला अटक केली होती.
advertisement
7/7
अभिमन्यू पोते याची चौकशी केली असता पुणे कनेक्शन समोर आलं. माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे आणि चिन्या अशी मारेकरांची नाव असून सगळे कोथरूड पुण्यातील राहणारे आहे. सगळे आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Sagar Moholkar: 'कर्मा'चा नियम! सागर मोहळकरचा 'गेम' वाजवणारे समोर, 13 दिवसांनी मृत्यूचं कारण उघड