TRENDING:

'धुरंदर: द रिव्हेंज'च्या सुरुवातीला रितेश वेड लावणार, धमन्यांमधून रक्त खवळणार; तो मोस्ट अवेटेड सिनेमा कोणता?

Last Updated:

आदित्य धर दिग्दर्शित, 'धुरंदर: द रिव्हेंज' बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर उद्या बॉक्स ऑफिसवर रिलीज होतोय. पण चित्रपटाच्या सुरूवातीला प्रेक्षकांना एक जबरदस्त सरप्राईज मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आदित्य धर दिग्दर्शित, 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. अखेर उद्या हा बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. पण चित्रपट रिलीजसोबतच प्रेक्षकांना आणखी एक जबरदस्त सरप्राईज मिळणार आहे. ते म्हणजे, 'धुरंदर: द रिव्हेंज'च्या सुरूवातीला रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा टीझर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 18 मार्चला अर्थात आज 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट पेड प्रिव्ह्यूज रिलीज होणार आहे. आजपासूनच प्रेक्षकांना 'राजा शिवाजी'चा टीझर थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. सिल्वर स्क्रीनवरच प्रेक्षकांना 'राजा शिवाजी'चा टीझर अनुभवता येणार आहे.
News18
News18
advertisement

रितेश देशमुख दिग्दर्शित, 'राजा शिवाजी' चित्रपट 1 मे 2026 पासून संपूर्ण देशभरातल्या थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार क्रेझ पाहायला मिळत असून चाहते टीझरसाठी उत्सुक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्याच्या स्थापनेच्या प्रवासाची झलक शिवप्रेमींना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात भारतातील एका महान योद्धाची गाथा आणि स्वराज्य स्थापनेचा संघर्ष टीझरमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय- अतुल यांच्या खांद्यावर आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्मच्या बॅनरखाली चित्रपट तयार झालेला आहे. जेनिलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली असून चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: रितेश देशमुखने केलेले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 'राजा शिवाजी' चित्रपट संपूर्ण देशभरात रिलीज होणार आहे. मराठी, हिंदी आणि तेलुगु या तीन भाषांमध्ये बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. अद्याप रितेशने 'राजा शिवाजी'चित्रपटाचे पोस्टर शिवाय कोणतेही अपडेट शेअर केलेली नाही. त्यामुळे रितेश देशमुखला पहिल्यांदाच 'राजा शिवाजी' चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'धुरंदर: द रिव्हेंज'च्या सुरुवातीला रितेश वेड लावणार, धमन्यांमधून रक्त खवळणार; तो मोस्ट अवेटेड सिनेमा कोणता?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल