TRENDING:

Weather Alert: गुढीपाडव्याला टेन्शन वाढलं, महाराष्ट्रावर महासंकट, 29 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात गुडीपाडव्याच्या दिवशीच वादळी संकट घोंघावत आहे. पुढील 24 तासांसाठी 29 जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7
Weather Alert: गुढीपाडव्याला टेन्शन वाढलं, महाराष्ट्रावर महासंकट, 29 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रावर ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच अस्मानी संकट घोंघावत आहे. राज्यात पश्चिमी डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे आज 19 मार्च रोजी वादळ, विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काह ठिकाणी ताशी 30 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह गारपीटचीही शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 22 जिल्ह्यांना यलो तर 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकणात आज 30 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहतील. तसेच मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस होईल. 19 मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी वादळ, विजा आणि ताशी 40-60 किमी वेगाने वारे वाहतील. घाट भागात जोरदार पाऊस होईल. अहिल्यानगरला ऑरेंज तर पुणे ते सोलापूर यलो अलर्ट असेल.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रावर आज अस्मानी संकट घोंघावत आहे. नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांना 24 तासांसाठी दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होईल. नाशिक आणि जळगावला ऑरेंज अलर्ट तर इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.
advertisement
5/7
मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाचं धुमशान असणार आहे. पुढील 24 तास धोक्याचे असून छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहतील. तसे वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. नागपूर, अमरावतीसह संपूर्ण विदर्भावर अवकाळी संकटाचे काळे ढग आहेत. वाशिम जिल्ह्या वगळता सर्वच जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. गारपीट होईल. तसेच तापमानाचा पारा 36 ते 41 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
7/7
गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. राज्यातील 29 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. वादळ, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिके, फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. तसेच रस्ते, वीज आणि इतर सेवांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील दक्षता घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: गुढीपाडव्याला टेन्शन वाढलं, महाराष्ट्रावर महासंकट, 29 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल