TRENDING:

सचिन आणि आईची केमिस्ट्री तर पाहिलीच असेल, पण अंजली आणि सासूमधलं बाँडिंग पहिल्यांदाच दिसलं; VIDEO

Last Updated:

सचिन तेंडुलकरने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत आईला नमस्कार केला. व्हिडिओमध्ये सचिन, अंजली आणि आई दिसतात. सासू-सुनेतलं प्रेमळ नातं पहिल्यांदाच दिसलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sachin wishes : आज संपूर्ण महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा आणि हिंदू नवं वर्षाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर हा केवळ त्याच्या खेळासाठीच नाही, तर त्याच्या नम्र स्वभावासाठी आणि कौटुंबिक मूल्यांसाठीही ओळखला जातो. आज, 19 मार्च 2026 रोजी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मंगल मुहूर्तावर सचिनने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.
News18
News18
advertisement

सचिन आणि अंजली तेंडुलकर यांनी दिल्या शुभेच्छा

सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने सर्वांचेच मन जिंकले आहे. व्हिडिओमध्ये सचिन, त्यांची पत्नी अंजली आणि त्यांची आई आहे. सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या चाहत्यांना नवं वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत आईला नमस्कार केल्याचा हा व्हिडिओ आहे. पण या व्हिडिओची खासियत काही वेगळी आहे. सचिन आणि त्यांच्या माता यांच्यातील बॉन्डिंग प्रत्येकालाच माहिती आहे. पण सासू आणि सुनेतलं नातं अनेकांना फारस माहिती नाही.

advertisement

सासू आणि सुनेतलं प्रेमळ नातं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाला मिळेना योग्य भाव, शेतकऱ्याने केला भारी प्रयोग, आता 9 लाख रुपयांचा नफा
सर्व पहा

सचिनने आपल्या आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. सचिन नेहमीच सांगतो की, त्याच्या यशामागे त्याच्या आईचे आणि कुटुंबाचे संस्कार आहेत. पण कधी न पाहिलेलं सासू सुनेतलं प्रेमळ नातं नवं वर्षाच्या मुहूर्तावर दिसून आलं. सचिन बरोबच अंजली तेंडुलकर यांनीही सासूच्या नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याचे दिसून आले. अनेकदा आपण सचिन आणि त्यांच्या आईची उत्तम केमिस्ट्री पाहिली आहे, पण सासू-सुनेतलं हे बाँडिंग पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सचिन आणि आईची केमिस्ट्री तर पाहिलीच असेल, पण अंजली आणि सासूमधलं बाँडिंग पहिल्यांदाच दिसलं; VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल