TRENDING:

'शंभराच्या नोटा देतो, 500ची नोट द्या' बोलता बोलता भर रस्त्यावर खिश्यातून पैसे गायब केले, वृद्धाला कळलंही नाही!

Last Updated:

तुकाराम झोरे हे सांगवी-माळेगाव रस्त्याने शेतातून घराकडे परतत होते. यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतच चालली आहे. कुठे मारामाऱ्या, कोयत्याने हल्ले आणि हत्येच्या घटना घडतच आहेत. आता तर भर रस्त्यावर एका वृद्ध नागरिकाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.   पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर इथं एका ज्येष्ठ शेतकऱ्याला दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी  बंदे पैशांच्या बहाण्याने ११ हजार रुपयांना हातचलाखीने लुटले आहे.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर इथं हा प्रकार घडला आहे.  याप्रकरणी तुकाराम रघुनाथ झोरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, दोघा अज्ञातांविरोधात भोरच्या राजगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  या दोन्ही चोरट्यांचे चेहरे नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

advertisement

“शंभराच्या नोटा देतो, पाचशेची नोट द्या”

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम झोरे हे सांगवी-माळेगाव रस्त्याने शेतातून घराकडे परतत होते. यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. “शंभराच्या नोटा देतो, पाचशेची नोट द्या,” असा बहाणा करत त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी झोरे यांना गोंधळात टाकत, भूल पडून हात चालकीने त्यांच्या खिशातील रोकड काढून घेतली आणि काही क्षणातच दुचाकीवरून पसार झाले.

advertisement

घटनेनंतर काही वेळाने झोरे यांच्या लक्षात आलं की, त्यांच्या खिशातील ११ हजार रुपये गायब झाले आहेत. यानंतर त्यांनी तत्काळ राजगड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, या चोरट्यांची चेहरे नसरापूर ग्रामपंचायत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, आरोपींचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत त्यामुळे पोलिसांनी त्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू केले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
4 तासांचा कॅफे, नोकरी सांभाळत करतात व्यवसाय, दोन इंजिनिअर मित्रांची कहाणी, Video
सर्व पहा

याप्रकरणी पोलीस हवालदार औदुंबर अडवाल तपास करीत आहेत. या घटनेनंतर अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी,” असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
'शंभराच्या नोटा देतो, 500ची नोट द्या' बोलता बोलता भर रस्त्यावर खिश्यातून पैसे गायब केले, वृद्धाला कळलंही नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल