एकीकडे Dhurandhar 2 रिलीज आणि दुसरीकडे रणवीरसह फिल्मची पूर्ण कास्ट, क्रू 'गायब'; कुठे गेले, झालं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar 2 : धुरंधर 2 रिलीज झाला आहे, लोकांमध्ये तो पाहण्याची क्रेझ आहे पण फिल्ममधील कलाकार मात्र कुठेच दिसत नाही आहेत. यामागील मोठं कारण समोर आलं आहे.
advertisement
1/7

कोणती फिल्म रिलीज होणार म्हटलं की त्या फिल्ममधील सेलिब्रिटी अनेक ठिकाणी दिसतात. फिल्मच्या प्रमोशनसाठी शक्य ते सगळं करतात. एखाद्या शोमध्ये जातात, मालिकेत दिसतात, मॉल किंवा मंदिरात जातात.
advertisement
2/7
'धुरंधर' या पहिल्या फिल्मवेळी कलाकार समोर येऊन बोलत होते. दिग्दर्शक वगळता फिल्ममधील प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञ मीडियाशी बोलत होता. अगदी फिल्मच्या गाण्यांमध्ये दिसलेल्या डान्सर्सनाही इतकी प्रसिद्धी मिळाली की त्यांना रिएलिटी शो आणि खाजगी कार्यक्रमात परफॉर्मन्ससाठी भरमसाठ मानधन दिलं जात होतं. पहिल्या भागाच्या यशामुळे प्रत्येकाला प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची भरपूर संधी मिळाली.
advertisement
3/7
पण धुरंधर 2 च्या बाबतीत मात्र असं काहीच नाही. कित्येक दिवसांपासून धुरंधर 2 ची चर्चाआहे. पण यातील कलाकार फार काही दिसत नाही आहेत. एकिकडे फिल्म रिलीज झाली आहे तर दुसरीकडे रणवीर कपूरसह फिल्मची संपूर्ण कास्ट, क्रू गायब आहेत.
advertisement
4/7
धुरंधर 2 रिलीज झालेला असताना फिल्ममधील कलाकार नेमके गेले कुठे, नेमकं झालं काय? असा प्रश्न पडला आहे. अखेर याचं कारण समोर आलं आहे.
advertisement
5/7
मीडिया रिपोर्टनुसार फिल्मचा दिग्दर्शक आदित्य धरने आपल्या टीमला 'धुरंधर : द रिव्हेंज' प्रदर्शित होईपर्यंत आपल्या संपूर्ण टीमला अंडरग्राऊंड होण्याचा आदेश दिला आहे, प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यामध्ये फक्त मोठे कार्यक्रमच नव्हे, तर मुलाखती आणि सार्वजनिक कार्यक्रमांचाही समावेश आहे.
advertisement
6/7
फिल्मबाबत लोकांची उत्सुकता कमी होऊ नये, यासाठी त्यांनी असं केलं आहे. फिल्मची टीमही चित्रपटाशी संबंधित प्रश्नांच्या भीतीने ते सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की अभिनेते आता वैयक्तिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमांनाही टाळत आहेत.
advertisement
7/7
आज तकने बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्ट हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाशी संबंधित एका प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं की, "आम्ही आता लग्न किंवा मंदिरात जाणंही टाळत आहोत. फक्त घरीच राहा, हाच आमचा मंत्र आहे. आम्हाला चित्रपटाबद्दल कोणत्याही अवघड प्रश्नांना सामोरं न जाण्याची सूचना देण्यात आली आहे. लोक या सिक्वेलबद्दल खूप उत्सुक आहेत आणि काहीही विचारू शकतात, त्यामुळे माध्यमांच्या नजरेपासून दूर राहणंच उत्तम आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकीकडे Dhurandhar 2 रिलीज आणि दुसरीकडे रणवीरसह फिल्मची पूर्ण कास्ट, क्रू 'गायब'; कुठे गेले, झालं काय?