TRENDING:

तुम्ही कधी पारंपरिक केरळी पेय कुल्की खाल्ली का? आता पुण्यात इथं उपलब्ध, Video

Last Updated:

पुण्याची खाद्यसंस्कृती ही नेहमीच वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पदार्थांसाठी ओळखली जाते. या ठिकाणी हे पारंपरिक केरळी पेय पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

मूळचे केरळचे असलेले सॅम जिथ आणि मेघालायची फर्स्टली या दोघांनी मिळून फर्स्टलीज हा व्यवसाय 2023 साली पुण्यात फर्स्टलीज या व्यवसायाची सुरुवात केली. आरोग्यदायी आणि नैसर्गिक पेयांचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा व्यवसाय सुरू करण्यात आला. सॅम जिथ यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात येऊन हा व्यवसाय उभा केला. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची साथ मिळाली असून, सध्या या ठिकाणी अनेक नाविन्यपूर्ण पेये ग्राहकांना मिळत आहेत.

advertisement

कुल्की हे मूळ केरळमधील लोकप्रिय पेय मानले जाते. कोवळ्या नारळाची मलई, गाईचे दूध  यांचे मिश्रण करून हे पेय तयार केले जाते. यामध्ये कोणतीही अतिरिक्त कृत्रिम साखर किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्ज वापरले जात नाहीत, त्यामुळे हे पेय आरोग्यदायी पर्याय म्हणूनही ओळखले जाते. काही पेयांमध्ये ताज्या फळांचा आणि सुकामेव्याचाही वापर केला जातो. यासाठी लागणारे काही घटक दक्षिण भारतातील राज्यांमधून आणले जातात, तर सुकामेवा अफगाणिस्तानमधून मागवला जातो.

advertisement

Firstlees मध्ये कुल्कीचे तब्बल 15 वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यामध्ये ओरिओ कुल्की, चॉकलेट कुल्की, कॉफी कुल्की, केळी कुल्की, पपई कुल्की, खरबूज कुल्की अशा विविध फ्लेवर्सचा समावेश आहे. तसेच साबुदा, मसूरा, कन्नूर कॉकटेल आणि अबुदा यांसारखी वेगळी पेयेही येथे मिळतात. याशिवाय आंबा, तुती, पेरू आणि इतर फळांपासून तयार केलेले फ्रूट शेकदेखील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

advertisement

या पेयाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज सुमारे 300 ते 400 ग्लास कुल्कीची विक्री होत असल्याची माहिती सॅम जिथ यांनी दिली. विशेष म्हणजे या पेयाची किंमत 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत असल्याने विद्यार्थी आणि तरुण वर्गामध्येही याची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
4 तासांचा कॅफे, नोकरी सांभाळत करतात व्यवसाय, दोन इंजिनिअर मित्रांची कहाणी, Video
सर्व पहा

केरळमधील पारंपरिक पेय कुल्कीनेही आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, येत्या काळात या पेयाची लोकप्रियता आणखी वाढताना पहायला मिळत आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
तुम्ही कधी पारंपरिक केरळी पेय कुल्की खाल्ली का? आता पुण्यात इथं उपलब्ध, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल